Home Breaking News बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

1582

रंगारीपुरा परिसरात होता वास्तव्यास

वणी: वातावरणातील असमतोलामुळे आजारपणात वाढ होताना दिसत आहे. आजारी असलेल्या 14 वर्षीय बालकाचा मंगळवार दि. 16 ऑगस्ट ला सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ग्रामीण रुग्णालयात घडली.

शिवम किसन मुळे (14) हा येथील रंगारीपुरा परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्यास होता. त्याची प्रकृती ठीक नसल्याने त्याला मंगळवारी सकाळी 7:30 वाजता उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी हलविण्यास सांगितले. मात्र अवघ्या काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांना कळवण्यात आले असून शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात येणार आहे.
वणी: बातमीदार