Home Breaking News वृद्धाश्रमातील वृद्धांना व ट्रक चालकांना ब्लॅंकेटचे ‘वाटप’

वृद्धाश्रमातील वृद्धांना व ट्रक चालकांना ब्लॅंकेटचे ‘वाटप’

523
C1 20240404 14205351

रिलायन्स पेट्रोल पंपचा स्तुत्य उपक्रम

वणी: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना सामाजिक भावना जपणं गरजेचं आहे. लालपुलिया परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंपचे संचालक रवी बेलूरकर व स्टाफ ने 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वृद्धाश्रमातील वृद्धांना व ट्रक चालकांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले तर रुग्णांना फळ वाटप केले.

लालपुलिया परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंपच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविण्यात आले. याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार प्रामुख्याने उपस्थित होते.

रिलायन्स बिपी मोबिलिटी लिमिटेड वणीचे संचालक रवी बेलूरकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीकांत पोटदुखे, संतोष डंभारे, राकेश बुग्गेवार, पंजाबराव बेलुरकर, नितिन शिरभाते, आशिष डंभारे, पंकज कासावार, प्रणव पिंपळे, नितीन बिहारी, राजेंद्र सिडाम, नंदु नागदेव, वैभव मांडवकर, अक्षय देठे, शुभम गोरे, शुभम इंगळे, सुरज निकुरे, नितेश मदिकुंटावार, नयन डंभारे, प्रविण पाठक उपस्थित होते.
वणी: बातमीदार