Home Breaking News त्या..घटनेतील एका तरुणाचा मृतदेह मिळाला

त्या..घटनेतील एका तरुणाचा मृतदेह मिळाला

● दुसऱ्याचा शोध युद्धस्तरावर

1056
C1 20240404 14205351

दुसऱ्याचा शोध युद्धस्तरावर

Wani News | तालुक्यातील नायगाव (खु) येथील सहा तरुण वर्धा नदीवर पोहायला गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील दोघे वाहून गेल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली होती. कोना शिवारात एकाचा मृतदेह मिळाला असून दुसऱ्याचा शोध युद्धस्तरावर सुरू आहे. The incident took place on Tuesday afternoon when the two were swept away due to the unpredictable flow of water.

प्रविण सोमलकर (36) या युवकाचा मृतदेह मिळाला आहे तर दिलीप कोसुरकर (40) याचा शोध सुरू आहे. प्रवीण हा नायगाव येथील जावई होता सुट्टीमुळे तो नायगाव येथे आला होता. येथील मित्रमंडळींनी सुट्टीत मौजमजा करण्याचा बेत आखला होता.

नायगाव (खु) येथील विशाल तुरकर (32), विजय उईके (38), स्वप्नील सुरतेकर (20), जगदीश बावणे (35) व ते दोघे असे सहा तरुण लगतच असलेल्या वर्धा नदीवर पोहचले. त्यांना पोहण्याचा मोह झाला, ते नदीपात्रात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने अघटित घडले. यातील दोघे वाहून गेले तर अन्य सुखरूप बाहेर पडले.

रात्री पर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली मात्र अंधार झाल्याने आज बुधवारी पहाटे पासून शोध सुरू असताना प्रवीण चा मृतदेह मिळाला आहे. पोलीस व महसूल प्रशासन वाहून गेलेल्या युवकांचा शोध घेत आहेत. अशीच एक घटना जुनाड येथे सुध्दा घडली असून त्या घटनेत भद्रावतीचे दोघे तरुण वाहून गेले आहेत.
Rokhthok News