Home Breaking News जुनाड घटनेतील दोन्ही तरुणाचे मृतदेह मिळाले

जुनाड घटनेतील दोन्ही तरुणाचे मृतदेह मिळाले

● शिरपूर पोलिसांनी राबवली शोधमोहीम

823

शिरपूर पोलिसांनी राबवली शोधमोहीम

Wani Sad News | चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे वास्तव्यास असलेले पाच तरुण जुनाड येथील वर्धा नदीच्या पुलावर बसले होते. त्यातील दोघांना पोहण्याचा मोह झाला. ते वर्धा नदीपात्रात उतरलेत मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही वाहून गेल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली होती. बुधवारी सकाळी शिरपूर पोलिसांनी पुन्हा शोध घेतला असता दोघांचे मृतदेह मिळाले आहेत. When the Shirpur police searched again on Wednesday morning, the bodies of both were found.

रितेश नथ्‍थु वानखडे (18) हा शिवाजी नगर भद्रावती येथील निवासी होता तर आदर्श देवानंद नरवाडे (20) गजानन नगर भद्रावती असे वाहून गेलेल्‍यांची नावे असून त्यांचे मृतदेह मिळाले आहेत. भद्रावती वरुन पाच तरुण जुनाड येथे आले होते. वर्धा नदीच्या पुलावर बसून गप्पा मारत असताना दोघांना पोहण्याचा मोह झाला.

रितेश व आदर्श हे दोघे पुलाच्या बाजूने नदीपात्रात उतरले त्यातील एकाला पाण्याचा अंदाज आला नाही. तो प्रवाहाने वाहून जात असताना दुसऱ्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्दैवाने दोघेही वाहून गेले. पुलावर बसलेल्या रोहन डोंगरे, अविनाश पचारे, मंथन चिंचोलकर या तिघांनी आरडाओरडा केला.

यावेळी काही नागरिकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते मिळून आले नाही. पोलिसांना तातडीने पाचारण करण्यात आले होते. पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवावी लागली. बुधवारी पहाटे शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील दुबे व पोलीस कर्मचाऱ्यांनी शोध घेतला असता दोघांचे मृतदेह मिळाले आहेत.
Rokhthok News