Home वणी परिसर पवनार (बंदी) परिसरात पट्टेदार वाघाचा संचार

पवनार (बंदी) परिसरात पट्टेदार वाघाचा संचार

361
C1 20240404 14205351

◆शेतकऱ्यां मध्ये भीतीचे वातावरण

मुकुटबन:- वनपरिक्षेत्रातील पवनार (बंदी) वनवर्तुळा लगत असलेल्या शेतशिवारात पट्टेदार वाघाचा मुक्तसंचार वाढल्याने शेती काम करणाऱ्यां शेतकरी व शेतमजुरांना अधून-मधून पट्टेदार वाघाचे दर्शन होत आहेत. परिणामी ते पट्टेदार वाघाच्या दहशतीत वावरत आपल्या शेतातील शेती कामे जीव मुठीत घेऊन करीत आहेत. दरम्यान परिसरात भीतीचे वातावरण आहेत.

पवनार(बंदी),कोसारा, डोंगरगाव, बोबापूर आणि आडकोली गाव परिसरात मागील काही दिवसांपासून पट्टेदार वाघाचा मुक्तसंचार वाढला आहेत. जंगला लगत असलेल्या या गाव  परिसरातील शेतीकाम करणाऱ्यांना पट्टेदार वाघाचे दर्शन होत आहेत. यातून शेतकरी वर्ग व शेतमजूर भयभीत होऊन चांगलेच धास्तावले आहेत. या परीस्थितीत शेतकरी व शेतमजूर कसे-बसे शेतीची कामे करीत आहेत. परिसरात शेतीकाम करणाऱ्यांना  या परिसरात मुक्त संचार करणाऱ्या पट्टेदार वाघाच्या पावलांचे ठसे  दृष्टीस पडत आहेत.

मुक्तसंचार करणाऱ्या पट्टेदार वाघ, जंगलात चराईसाठी गेलेल्या जनावरांवर हल्ला चढवून फस्त करण्याच्या घटनेत दररोज भर पडत आहेत. यात  गुराखीही पट्टेदार वाघाच्या दहशदीत आहेत. शेतकरी लवकरच घरी परतत आहेत. परिसरात पट्टेदार वाघाचे अस्तित्व कायम असल्याने शेतमजुरही  शेती कामासाठी धजावत नसल्याचे शेतीची कामे खोळंबल्या गेली आहे. वनवर्तुळात लगतच्या शेत शिवारात पट्टेदार वाघाची दहशद निर्माण झाल्याने वाघाचा बंदोबस्त करण्याच्या मागणीला जोर धरत आहे.शेतकऱ्यां मध्ये भीतीचे वातावरण