Home वणी परिसर मारेगाव येथे पोलिसांचा रूट मार्च

मारेगाव येथे पोलिसांचा रूट मार्च

306

● शांतता व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

मारेगाव: दीपक डोहणे

तालुक्यात जयंती उत्सव व सणासुदीला कायम शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मारेगाव पोलिसांनी गुरुवारला सकाळी पथसंचलन केले. या रूट मार्च ने नागरिकांना सतर्क राहण्यासाठी इशारावजा देण्यात आला.

भारत देश हा सुसंस्कृत देश म्हणून ओळखला जातोय. देशात कायम शांतता नंदाण्यासाठी शासनदरबारी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. याचाच एक भाग म्हणून गावपातळीवर साजरी होणारी जयंती, सण आदी उत्सवाच्या काळात मारेगाव तालुक्यात कायम शांतता नांदावी यासाठी रूट मार्च करण्यात आले.

पोलीस अधीक्षक डॉ.भुजबळ पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या नेतृत्वात मारेगाव शहराच्या प्रमुख मार्गाने पादक्रांत करीत पथ संचलन करण्यात आले. यात दोन अधिकारी, तीस पोलीस कर्मचारी, 45 होमगार्ड सह तीन पोलीस जीप व तीन पोलीस दुचाकीवरून रूट मार्च करण्यात आला. तालुक्यात सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुक्यात कायम शांतता अबाधित ठेवण्यासाठी व सतर्कता बाळगण्याची ही नागरिकां करिताच दरवर्षी प्रमाणे यंदाही रंगीत तालीम करण्यात आली.