Home Breaking News ‘समीर’चा पोलीस कोठडीतील मुक्‍काम वाढला

‘समीर’चा पोलीस कोठडीतील मुक्‍काम वाढला

● नव्‍याने दरोडयाचा गुन्‍हा दाखल

2707
C1 20231016 18243560

 नव्‍याने दरोडयाचा गुन्‍हा दाखल

Wani News | अतिशय मोक्‍याच्‍या ठिकाणी असलेल्‍या मालमत्‍तेचा ताबा मिळविण्‍यासाठी जेसीबी मशीनच्या साह्याने अंधाऱ्या राञी चक्‍क दुकानच जमीनदोस्त केल्‍याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलीसांनी मुख्‍य सुञधार समीर रंगरेजच्‍या मुसक्‍या आवळल्‍या होत्‍या. न्‍यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवार दिनांक 16 ऑक्‍टोबरला त्‍याला पुन्हा न्‍यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पोलीसांनी याप्रकरणी नव्‍याने दरोड्याचा गुन्‍हा दाखल केला आहे. The police have registered a new case of robbery in this case.

शहरातील मुख्‍य चौकात असलेल्‍या मालमत्‍तेचा वाद चांगलाच चिघळला आहे. ती मालमत्‍ता नेमकी कोणाची हा सखोल संशोधनाचा विषय आहे. परंतु समीर रंगरेज याचे जवळ संबधीत मालमत्‍तेचे खरेदी खत असल्‍याचे बोलल्‍या जात आहे. तर त्‍या ठिकाणी ताबा असलेल्‍या पंकज भंडारी यांनी या प्रकरणी न्‍यायालयात धाव घेतल्याचे सांगीतल्‍या जाते.

विवादित जागेवर भंडारी यांचे नवकार फर्निचर नामक दुकान आहे. त्‍यात किमती साहित्‍य ठेवण्‍यात आले होते. त्‍या जागेचा ताबा मिळावा याकरीता रंगरेज याने चक्‍क जेसीबी मशीनच्‍या साह्याने संपुर्ण दुकानच जमिनदोस्‍त केले. यात 18 लाख रुपयांचे नुकसान तर एक लाख 70 हजार रुपयांची चोरी झाल्‍याची तक्रार भंडारी यांनी पोलीसांत नोंद‍वली होती.

पोलीसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फरार मुख्‍य सुञधाराच्‍या मध्‍यप्रदेशातुन मुसक्‍या आवळल्‍या. त्‍याचेवर भादवि कलम 457, 380, 427 अन्‍वये गुन्‍हा नोंद केला होता. माञ गुन्‍हयाचे स्‍वरुप बघता पुन्‍हा नव्‍याने भादवि कलम 397 चा समावेश करण्‍यात आला आहे. पुर्वी त्‍याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली होती त्‍यात आता दोन दिवसांची वाढ करण्‍यात आली आहे.
Rokhthok News

मुलाच्‍या कृत्‍याचा पित्‍याने केला निषेध
समीरचे वडिल रफीक रंगरेज हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर- समाजभूषण पुरस्कार प्राप्त समाजसेवक आहेत तसेच शांतता समितीचे सदस्य आहे. आपल्या मुलानेच कायदा हातात घेऊन असे कृत्य करावे हे त्यांना पटलेले नाही. त्यामुळे त्यांनी मुलाच्या या कृत्याचा जाहीर पत्रक काढून निषेध केला. मात्र जनतेनी या घटनेला राजकीय रंग देऊन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये अशी विनंतीही त्यांनी पत्रकातून केली आहे.