Home Breaking News धक्कादायक…आंदोलक स्वप्नील धुर्वे यांची ‘एक्झिट’

धक्कादायक…आंदोलक स्वप्नील धुर्वे यांची ‘एक्झिट’

1488
C1 20240404 14205351

हृदयघाताने झाला मृत्यू 

वणी: सामाजिक प्रश्नाचे भान जपत मागील अनेक वर्षांपासून प्रखर आंदोलन करून सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या आंदोलक स्वप्नील धुर्वे यांचा हृदयघाताने झालेला मृत्यू चळवळ पोरकी करणारा आहे. गुरुवार दि. 17 मार्च ला पहाटे 7 वाजताच्या दरम्यान त्यांची झालेली ‘एक्झिट’ मनसुन्न करणारी आहे.

राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यापासून ते जिल्हा सरचिटणीस पदा पर्यंत धुर्वे यांचा प्रवास आक्रमक राहिला आहे. त्यांनी केलेल्या आंदोलनापैकी सर्वाधिक प्रभावशाली आंदोलन ” लढा शिक्षणाचा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा” या टॅग लाईनच्या माध्यमातून त्यांनी शेकडो विध्यार्थ्यांना अकरावीत निशुल्क प्रवेश मिळवून दिला होता.

चिखलगाव लगत असलेल्या कोलडेपो मुळे उधभावलेल्या प्रदूषणाबाबत नुकतेच आंदोलन करून कोलडेपो हटविण्याची मागणी केली होती. तर एक दिवसापूर्वीच अवैद्य गौण खनिजांच्या वाहतुकी संदर्भात आवाज उठवला होता.

गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक होत असल्याने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान सकाळी सात वाजताच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
वणी: बातमीदार