Home वणी परिसर पोलिसांचा उत्साह आणि रक्तदात्यांचा सहभाग

पोलिसांचा उत्साह आणि रक्तदात्यांचा सहभाग

● वणीत अभूतपूर्व, विक्रमी रक्तदान ● जिल्‍हा पोलीस प्रशासनाचे आयोजन

415

वणीत अभूतपूर्व, विक्रमी रक्तदान
जिल्‍हा पोलीस प्रशासनाचे आयोजन

blood donation news | सामाजिक दायीत्‍व समजुन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन वणीतील दक्षता सभागृहात दि.16 मे ला करण्‍यात आले होते. याप्रसंगी दहा पोलीस अधिकारी व 110 पोलीस कर्मचारयांनी रक्‍तदान केले तर सामाजीक संघटना,  नागरीक अशा एक हजार 111 रक्‍तदात्‍यांनी सहभाग नोंदवला. जिल्‍हयात प्रथमच विक्रमी रक्‍तदान झाल्‍याचे बोलल्‍या जात आहे. A grand blood donation camp was organized on behalf of the district police force as a social responsibility

c1_20230517_17422908

रक्‍तदान शिबीर हे काळाची गरज झाली आहे. ऐन वेळी जाणवणारा रक्ताचा तुटवडा रुग्णाच्या जीवितावर बेततो. रुग्णालयातील रक्तपेढीत रक्तसाठा सदोदित उपलब्ध असावा या करिता जिल्‍हा पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड ( pavan bansod ) यांनी पोलीस प्रशासनाच्‍या माध्‍यमातुन रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्‍याच्‍या सुचना दिल्‍या होत्‍या. रक्तदात्यांनी रक्तदान हे जीवनदान समजून आपले कर्तव्य पार पडावे असे आवाहन याप्रसंगी करण्‍यात आले होते.

c1_20230517_17403915

जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पवनकुमार बन्सोड व अपर पोलीस अधिक्षक डॉ. पियुश जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांचे मार्गदर्शनाखाली वणी, मारेगांव व शिरपुर पोलीस स्‍टेशनच्‍या माध्‍यमातुन रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्‍यात आले होते. रक्त हे कृत्रीमरित्या तयार करता येत नाही तसेच मानवी रक्तघटक ठराविक काळच साठविता येतात त्यामुळे सातत्याने रक्त संकलीत करणे काळाची गरज आहे या उद्देशानेच आयोजीत विक्रमी रक्तदान शिबिर पार पडले.

रक्तसाठ्याची गरज लक्षात घेता वसंतराव नाईक शासकीय रूग्णालय यवतमाळ व त्यांचे सहकारी ब्लड बँक यांचे चमुने या शिबीरात रक्त संकलन केले. सदर रक्तदान शिबीरासाठी वणी, शिरपुर, मारेगाव येथील पोलीस पाटील, शिक्षण विभाग पंचायत समीती वणी,  सिंधी समाज, शिव स्वराज युवा मंच, संस्कार तेलतुबडे, टिडीआरएफ (TDRF), स्माईल फॉन्डेशन,  कुणाल चोरडीया, राकेश खुराणा, व्यापारी संघटना, एमएसएफ (MSF) आणि विवीध खाजगी संघटना, तसेच महीला दक्षता समीती यांनी सहभाग नोंदवला.

वणीचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, शिरपुर पोलीस स्‍टेशनचे API गजानन करेवाड, मुकुटबन चे पोलीस निरिक्षक अजीत जाधव, वाहतुक शाखेचे API संजय आत्राम, API माया चाटसे, डीबी पथक प्रमुख API माधव शिंदे, PSI प्रवीण हिरे, PSI आशिष झिमटे, वाहतूक शाखा व डीबी, एलसीबी पथकाचे सर्व कर्मचारी यांनी शिबिराच्या यशस्वीतेकरिता अथक परिश्रम घेतले.
ROKTHOK NEWS