Home वणी परिसर प्रतिएकर 50 लाख रुपये मोबदला द्या..!

प्रतिएकर 50 लाख रुपये मोबदला द्या..!

mns नेते राजु उंबरकर (raju umbarkar) यांनी जनसुनावणी मध्ये आक्रमक पवित्रा घेतल्याने प्रकल्प बाधित शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला.

1622
C1 20240404 14205351

मनसे नेते राजु उंबरकर यांची मागणी

mns news | झरी जामनी तालुक्‍यातील मार्की – मांगली कोळसाखान प्रकल्पा बाबत दोन दिवसांपुर्वी जनसुनावणी घेण्‍यात आली होती. याप्रसंगी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे mns नेते राजु उंबरकर (raju umbarkar) यांनी जनसुनावणी मध्ये आक्रमक पवित्रा घेतल्याने प्रकल्प बाधित शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला. तसेच प्रतिएकर 50 लाख रुपयांचा मोबदला द्यावा अशी मागणी रेटून धरली. Maharashtra Navnirman Sena leader Raju Umbarkar took an aggressive stance in the public hearing, which brought relief to the project-affected farmers.

जनसुनावणी अध्यक्षीय अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी ईआयए नोटिफिकेशन 2006 अंतर्गत मार्की – मांगली कोळसाखान प्रकल्प धारक मे.यझदानी इंटरनॅशनल प्रा.लि. भुवनेश्वर याकरीता जनसुनावणी बोलाविली होती. यावेळी परिसरातील शेकडो शेतकरी प्रामुख्‍याने उपस्थित होते. स्‍थानिक नागरीकांनी नियमान्‍वये प्रश्‍न उपस्थित केल्‍याने अधिकाऱ्यांची भांबेरी उडाली यामुळे सुनावणी चांगलीच वादग्रस्‍त ठरली.

मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना  50 लाख रुपये प्रति एकर प्रमाणे आर्थिक मोबदला द्यावा तसेच संपूर्ण जमीन खरेदी करावी अशा दोन मागण्‍या रेटून धरल्‍यात. जन सुनावणी समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्याकडे मत व्‍यक्‍त करत दोन्‍ही मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा स्थानिक शेतकरी आणि नागरिकांचा रोष सहन करावा लागेल असे स्‍पष्‍ट केले.
ROKHTHOK NEWS