Home यवतमाळ समाजमाध्यमातून धार्मीक तेढ निर्माण केल्यास कठोर कारवाई, पोलीस अधीक्षकांचा ‘Ultimatum’

समाजमाध्यमातून धार्मीक तेढ निर्माण केल्यास कठोर कारवाई, पोलीस अधीक्षकांचा ‘Ultimatum’

● नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन

547
C1 20240404 14205351

नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Police news yavatmal | सोशल मीडीया वर आक्षेपार्ह विधान, फोटो टाकुन धार्मीक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही. असा सज्जड इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड ( dr. Pavan bansod) यांनी प्रसिद्धी पत्रातून दिला आहे तर नागरीकांना सावधान व सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Appeal to citizens to be careful and alert

काही समाजकंटक समाजामध्ये Whats app, facebook, Instagram द्वारे धार्मीक भावना दुखावल्या जातील अशा प्रकारचे व्हिडीओ, पोस्ट तयार करुन वायरल करतात. ज्यामुळे सामाजीक वातावरण बिघडुन समाजामध्ये तेढ निर्माण होते व जातीय दंगली घडत आहेत. महाराष्ट्रातील काही घटनांमध्ये जीवीत हानी तसेच सार्वजनीक खाजगी मालमत्तेचे नुकसान सुध्दा झालेले आहे.

जिल्ह्यात 2023 मध्ये धार्मीक बाबीसंबधाने एकुण अकरा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. असे कृत्य करणाऱ्या सहा आरोपींना त्वरीत अटक करुन प्रभावी प्रतीबंधक कार्यवाही करण्यात आलेली आहे. या गुन्ह्यामध्ये चार आठरा वर्षाखालील बालकाचा समावेश असल्याने त्यांच्या पालकांविरुध्द कार्यवाही करण्यात आली आहे.

धार्मीक बाबीसंबधाने दाखल झालेल्या एकुण अकरा गुन्ह्यापैकी नऊ गुन्हे सोशल मीडीया वर हिंदु मुस्लीम धर्मातील महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधान, फोटो टाकल्यामुळे अतिशय गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. यापुढे आक्षेपार्ह विधान, फोटो टाकुन धार्मीक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही भुलथापांना तसेच प्रलोभनांना बळी न पडता कुठल्याही प्रकारच्या धार्मीक चिथावणीच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट सोशल माडीया वर वायरल करू नये. असे जाहीर आवाहन यवतमाळ जिल्हा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
वणी: बातमीदार