Home Breaking News पालिका प्रशासनाला सात दिवसाचा अल्टिमेटम 

पालिका प्रशासनाला सात दिवसाचा अल्टिमेटम 

● शहरातील पाणीप्रश्‍न सोडवावा अन्‍यथा.. ● संजय खाडे यांच्या नेतृत्‍वात निवेदन

281
C1 20240517 18554249
Img 20240613 Wa0015

शहरातील पाणीप्रश्‍न सोडवावा अन्‍यथा..
संजय खाडे यांच्या नेतृत्‍वात निवेदन

Wani News | मे हिटच्‍या झळा नागरीकांना सोसाव्‍या लागत असतांनाच पालिकेच्‍या पाणी पुरवठ्याला घरघर लागली आहे. पंधरा- पंधरा दिवस नागरिकांना पाणी पुरवठा होत नसल्‍याने कमालीचा संताप व्‍यक्‍त होत आहे. कॉग्रेसचे संजय खाडे यांनी कार्यकर्त्यांसह मुख्‍याधिकारी यांची भेट घेत सात दिवसात पाणीप्रश्‍न सोडवावा अन्‍यथा तिव्र स्‍वरुपांचे आंदोलन करावे लागेल असा ईशारा निवेदनातुन दिला आहे. Due to the lack of water supply to the citizens for fifteen days, extreme anger is being expressed.

वणीकर नागरिकांना पाणी टंचाईच्‍या झळा सोसाव्‍या लागत आहे. अधिकारी व कंञाटदार यांची मनमानी याला सर्वस्‍वी कारणीभूत असल्‍याचे दिसत आहे. मागील अनेक महिन्‍यांपासुन अपुरा पाणी पुरवठा होत आहे. मे महिन्‍यात तर पालीका प्रशासनाने पाणी पुरवठयाकडे लक्ष न दिल्‍याने काही भागात गेल्या 15 दिवसांपासून नळ आलेले नाही. यामुळे सर्वसामान्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.

अन्यथा पालिकेसमोर आंदोलन
वणीकर अपु-या पाणी पुरवठयांने वैतागले आहे. अनेकदा मध्यरात्री नळ सोडले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी संपूर्ण रात्र नळाची वाट पाहत काढावी लागते. अनेकदा तर नळ सुध्‍दा येत नाही यामुळे वणीकर चांगलेच हैराण झाले आहेत. येत्या एक आठवड्यात वणीकरांची पाणी समस्या सोडवावी. अन्यथा वणीकरांना सोबत घेऊन नगर पालिकेसमोर मोठे आंदोलन केले जाईल.
संजय खाडेकाँग्रेस

याप्रसंगी राजाभाऊ पाथ्रडकर, साधना गोहोकर, शारदा ठाकरे, अशोक चिकटे, प्रेमनाथ नैताम, पीएस उपरे, प्रमोद लोणारे, पलाश बोढे, क्रिष्णा पचारे, सुरेश बनसोड, लता भोंडाळे,  मिनाक्षी रासेकर, पद्मा ताजणे, सारिका बोबडे, संगिता खाडे, विजयालक्ष्मी आगबत्तलवार, ललिता बरशेट्टीवार, मंगला झिलपे, सविता रासेकर, अशोक पांडे, कैलास पचारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
Rokhthok News

C1 20240529 15445424