Home Breaking News त्याने…गळफास घेतला, आत्महत्येचे कारण कळेना..!

त्याने…गळफास घेतला, आत्महत्येचे कारण कळेना..!

993
C1 20240404 14205351

सुखी संसाराला लागले ग्रहण
करणवाडी येथील घटना

वणी: मारेगाव तालुक्यात आत्महत्येचे सावट घोंगावत आहे. एक दिवसाआड सुरू असलेले सत्र थांबताना दिसत नाही. शुक्रवार दि. 17 जूनला रात्री 9:30 वाजताच्या दरम्यान करणवाडी येथील 30 वर्षीय युवकाने गळफास घेवून जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली.

प्रशांत अरुण काळे (30) असे मृतकाचे नाव आहे. तो करणवाडी येथील निवासी आहे. त्याचे गावात किराणा दुकान असून घटनेच्या दिवशी तो दिवसभर आपले काम करत होता. सायंकाळी गावातील वीज खंडित झाल्याने त्याने दुकान बंद केले आणि घरी गेला.

त्याच्या मनात काय घोंगावत होते याबाबत काहीच कळू शकले नाही. आपल्या घरातच त्याने गळफास लावून आत्मघात केला. ही बाब घरच्या मंडळींना कळताच एकच कल्लोळ झाला, कोणालाच काही सुचत नव्हते. प्रत्यक्षदर्शींनी तातडीने मारेगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य बघता पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आणि शव उत्तरीय तपासणी साठी पाठवण्यात आले. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून मृतकाने आपल्या चार वर्षीय बाळाला पोरके केले आहे. आर्थिक विवंचना याला कारणीभूत आहे की अन्य कारण हे पोलीस तपासाअंती स्पष्ट होणार आहे.
वणी: बातमीदार