Home वणी परिसर वणीत संस्कृत सप्ताहाचे आयोजन.

वणीत संस्कृत सप्ताहाचे आयोजन.

179

वणी बातमीदार:-संस्कृत भारती वणी शाखा, लोकमान्य टिळक महाविद्यालय आणि आदर्श प्रशासकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी देखील संस्कृत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोविड 19 च्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील नाईलाजान संस्कृत सप्ताहाचे आयोजन आभासी पद्धतीने करण्यात आले आहे.

या सप्ताहाच्या निमित्ताने संस्कृत भारती चे विविध कार्यकर्ते आणि विद्यार्थी संस्कृत कवींची माहिती सादर करणार आहेत. त्याच सोबत संस्कृत स्तोत्र, संस्कृत गीत, संस्कृत सुभाषिते, संस्कृत श्लोक पाठ, संस्कृत निबंध, विविध वेशभूषा अशा विविध माध्यमातून अनेक विद्यार्थी सादरीकरण करणार आहेत.

प्रशांत भाकरे, महेश पुंड, आनंद बनसोड, रेणुका अणे, कोमल बोबडे, गायत्री महालक्ष्मे, रेणुका आमटे, कीर्ती कोंडावार, कल्याणी भागवत, वृषाली देशमुख हे कार्यकर्ते या विविध सादरीकरणांची तयारी करून घेत आहेत.

19  ते 25 ऑगस्ट या कालावधीत सादर होत असलेल्या या आभासी संस्कृत सप्ताहाचा  सर्व संस्कृत प्रेमींनी आवर्जून आस्वाद घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन संस्कृत भारती चे अध्यक्ष लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे संस्कृत विभाग प्रमुख डॉ. स्वानंद गजानन पुंड यांनी केले आहे