Home Breaking News अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार

2951

नायगाव फाट्या जवळ अपघात

वणी: आपले काम आटपून गावाकडे दुचाकीने निघालेल्या 30 वर्षीय युवकाला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात तो जागीच ठार झाल्याची घटना रात्री 7 :30 वाजताचे सुमारास घडली.

राहुल उरकुडे (30) असे मृतकाचे नाव आहे. तो कोना या गावातील रहिवासी आहे. वणी येथून आपले काम आटपून तो ऍक्टिवा या दुचाकीने गावा कडे जाण्यासाठी निघाला होता.

नायगाव फाट्या समोर असलेल्या पेट्रोल पंप जवळ भरधाव अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. या धडकेत राहुलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला आहे. यावेळी धडक देणारे वाहन पसार झाले आहे.
वणी: बातमीदार