Home Breaking News शिक्षकाला बेदम मारहाण, जीवे मारण्‍याची धमकी

शिक्षकाला बेदम मारहाण, जीवे मारण्‍याची धमकी

● क्षुल्‍लक बाब ठरले वादाचे कारण

5426

क्षुल्‍लक बाब ठरले वादाचे कारण

Wani crime News | तालुक्‍यातील जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेत शिक्षक म्‍हणुन कर्तव्‍यावर असलेल्‍या व्‍यक्‍तीला पाच जणांनी बेदम मारहाण केली आणि जीवे मारण्‍याची धमकी दिली. ही घटना बुधवार दिनांक 17 ऑगष्‍टला सायंकाळी 5 वाजताच्‍या दरम्‍यान छोरीया लेआउट परिसरात घडली. Five people beat them up and threatened to kill them.

शहरात सध्‍यस्थितीत गुन्‍हेगारी प्रवृती वाढल्‍याचे दिसत आहे, लहानसहान कारणावरुन हाणामारी होतांना दिसत आहे. जिल्‍हा परिषद शाळा निवली ये‍थे कर्तव्‍यावर असलेले शिक्षक विलास महादेव टोंगे (36) हे वासेकर लेआउट परिसरात वास्‍तव्‍यास आहेत. ते सुनिल अजबराव शिरसागर(42) या मिञासह आपल्‍या दुचाकीने वणी कडुन गणेशपुर टी पॉईन्ट वरुन ड्रीम लॅन्ड सिटी मधील प्लॉट पाहण्याकरीता जात होते.

गणेशपुर टी पॉईन्ट वर त्‍या शिक्षकांचे मिञ प्रविण भोयर रा.छोरीया लेआउट गणेशपुर याच्या सोबत दोन व्‍यक्‍ती वाद घालतांना दिसले. हे बघताच शिक्षकाने आपली दुचाकी थांबवून काय प्रकार आहे याची खातरजमा केली आणि 112 वर पोलीसांना कॉल करण्‍याचे मिञाला सांगीतले. मारहाण करणाऱ्यानी त्या व्‍यक्‍तीला सोडुन शिक्षकांकडे मोर्चा वळवला व अश्‍लील शिवीगाळ करत जीवे मारण्‍याची धमकी देत टोंगे यांना जबर मारहाण केली.

शिक्षक टोंगे यांना दोघे व्‍यक्‍ती जबर मारहाण करत असतांनाच आनखी तिघे त्‍या ठिकाणी आले. त्‍या सर्वानी लाथा बुक्यांनी मारायला सुरुवात केली. तर छातीवर बसलेल्‍या एकाने मोठा दगड उचलुन डोक्‍यावर मारण्‍याचा प्रयत्‍न केला असता शिक्षकाने उजव्‍या हाताने प्रतिकार केल्‍याने अनर्थ टळला. या घटनेत शिक्षकाचा डाव्‍या कानाचा पडदा फाटला असुन मोठया प्रमाणात मुकामार लागला आहे.

विक्की हारोडे (31), पवन चांदेकर (28) हे दोघे राहणार सेवानगर, पिटर उर्फ रुपेश बोडे (27), मयुर शेंडे (26) दोघे राहणार गणेशपुर व एक अनोळखी इसम अशा पाच व्‍यक्‍तींनी मारहाण केल्‍याची तक्रार पोलीसात नोंदविण्‍यात आली आहे. या प्रकरणी पोलीसांनी विविध कलमान्‍वये गुन्‍हा नोंद केला आहे. ठाणेदार अजित जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि माया चाटसे पुढील तपास करताहेत.
Rokhthok News