Home वणी परिसर नगराध्यक्षा विरोधात कुणी केली पोलिसात तक्रार

नगराध्यक्षा विरोधात कुणी केली पोलिसात तक्रार

966
C1 20240404 14205351

● शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा नोंद 

वणी :- वणी नगर पालिकेचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी नगरसेवकाला शिवीगाळ केल्या प्रकरणी नगरसेवकाच्या तक्रारी वरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

वणी नगर पालिकेत भाजपची एक हाती सत्ता आहे. नगराध्यक्षपदाची सूत्र  तारेंद्र बोर्डे याचे कडे देण्यात आली. 26 सदस्य असलेल्या नगर  पालिकेत भाजपाचे 22 नगरसेवक आहे. अंतर्गत वादामुळे नगरसेवकांमध्ये गटबाजी निर्माण होऊन आता हा वाद पोलीस ठाण्या पर्यंत पोहचला आहे.

धीरज पाते हे प्रभाग क्र 7 मधून भाजपा च्या चिन्हावर निवडुन आले आहे. पाते यांना दोन वर्षांपूर्वी पक्षाने निलंबित केले होते. नगरसेवक पाते यांनी दि 13 सप्टेंबर ला नगर पालिके कडे 3 मार्च 2018 ला झालेल्या सभेत घेण्यात आलेल्या ठरावाच्या सत्यप्रतिची मागणी केली होती.

दि 16 सप्टेंबर ला सकाळी 10:30 वाजताचे सुमारास  नगराध्यक्ष बोर्डे यांनी पाते यांना फोन करून आपल्या कक्षात बोलावले व तू माझी माझी तक्रार का केली म्हणून  शिवीगाळ करून तुला पाहून घेतो अशी धमकी दिल्याचा आरोप करीत  पाते यांनी पोलिसात तक्रार दिल्याने नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे वर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

● तक्रारीत तथ्य नाही ●

 मी पाते यांना माझ्या कक्षात त्यांनी मागितलेल्या माहिती बाबत बोलावले होते. मात्र मी त्यांना कुठल्याही प्रकारची शिवीगाळ केली नाही, की धमकी दिली नाही. त्या वेळी माझ्या कक्षात वणीतील एक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. स्वतःचे नाव मोठे करण्यासाठी ही तथ्यहीन तक्रार करण्यात आली आहे.

  तारेंद्र बोर्डे, नगराध्यक्ष, वणी