Home क्राईम सावधान….चोरटे तिसऱ्या डोळ्यात कैद

सावधान….चोरटे तिसऱ्या डोळ्यात कैद

● चोरट्यांचा शहरात शिरकाव ● पोलीस प्रशासन अद्याप चिरनिद्रेत

2486

चोरट्यांचा शहरात शिरकाव
पोलीस प्रशासन अद्याप चिरनिद्रेत

Crime News Wani : शहरात चोरी, घरफोडीच्या घटनेत कमालीची वाढ झाली आहे. पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून चोरटे आपला कार्यभाग उरकवत आहे. एकाच रात्री अनेक घरे चोरट्यांच्या निशाण्यावर आहेत. वणीकर नागरिकांनो सावधान… अट्टल चोरट्यांचा शहरात शिरकाव झालेला आहे. चोरटे तिसऱ्या डोळ्यात कैद झालेले असताना पोलीस प्रशासन मात्र अद्याप चिरनिद्रेत आहे. Many houses are on the target of thieves, Wanikar citizens beware.

चोरटे बंद घरांना प्रामुख्याने लक्ष करताना दिसत असून विद्यानगरी परिसरात चोरट्यांनी धुडगूस घातला तर बँक कॉलनी परिसरात उच्छाद मांडला. शनिवारी मध्यरात्री चार ते पाच घरी चोरीचा प्रयत्न करण्यात आला. ही शहरातील पहिलीच घटना नव्हे यापूर्वी सुद्धा द्वारका नगरी परिसरात चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे.

पत्रकारांवरील हल्ला ठाणेदारांना भोवला
वणी पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या ‘रामभरोसे’ कार्यपद्धती मुळे चोरट्यांनी शहरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. सलग होत असलेल्या घटना आणि त्यातच चक्क पत्रकारावर चोरीच्या प्रयत्नात केलेला हल्ला व उत्पन्न झालेला रोष ठाणेदारांना चांगलाच भोवला होता.

वणी शहरात पोलिसांचा वचक संपुष्टात आल्याचे हे द्योतक आहे. निव्वळ थातुरमातुर कारवाया म्हणजे कर्तव्यदक्षता हे समजण्याचे कारण नाही. क्लिष्ट गुन्हे आणि घडणारे गुन्हे यावर आळा घालण्याचा प्रयत्न पोलिसांनी करणे गरजेचे आहे. शहरात सातत्याने घडणाऱ्या घटना भविष्यात धोकादायक वळणावर नेणाऱ्या आहेत.

वणी शहरात चोरट्यानी मांडलेला उच्छाद आणि नागरिकांत निर्माण झालेले भयभीत वातावरण हे निवळण्याची ताकद केवळ पोलीस प्रशासनात आहे. घडलेल्या लहानसहान घटनेची तक्रार दाखल करणे पोलिसांचे कर्तव्य आहे मात्र तसे होताना दिसत नाही. चोरट्यांचा धुडगूस आणि तक्रार दाखल करण्याच्या नावाने पळवाट हे भविष्यात पोलिसांनाच “डेंजरझोन” मध्ये नेणारे आहे.
Rokhthok News