Home Breaking News विजेचा कडकडाट आणि धुव्वाधार पावसाचे घमासान

विजेचा कडकडाट आणि धुव्वाधार पावसाचे घमासान

54

काहीवेळ जनजीवन विस्कळीत

रोखठोक : परतीच्या पावसाने अद्याप उसंत घेतली नाही. दररोज कोसळधार बघायला मिळत आहे. सोमवार दि. 17 ऑक्टोबर ला दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान विजेचा कडकडाट आणि धुव्वाधार पाऊस बरसला. अचानक अवतरलेल्या पावसाने शहरात जनजीवन विस्कळीत झाले तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली.

तालुक्यात सोयाबीन काढणीला सुरुवात झाली आहे. सण उत्सवाचे दिवस असल्याने शेतकऱ्यांची पीक घरी नेण्यासाठी लगबग सुरू आहे. परतीच्या पाऊसाने मागील काही दिवसांत चांगलाच गोंधळ घातला आहे. विजेच्या कडकडाटाने दणाणून टाकले तर पावसाने अक्षरशः तांडव केले. यामुळे शहरातील बाजारहाट करण्यासाठी आलेल्यांची तारांबळ उडाली.

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. यावर्षी अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचा पिच्छाच सोडला नाही. झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्पादन क्षमता घटली आहे. तरी सुद्धा जे मिळेल त्यात समाधान मानणारा बळीराजा आर्थिकदृष्ट्या खंगत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.
वणी: बातमीदार