Home Breaking News त्या…. मंत्र्यांचा पुतळा जाळला, भाजपा आक्रमक

त्या…. मंत्र्यांचा पुतळा जाळला, भाजपा आक्रमक

917
C1 20240404 14205351

आ. बोदकुरवार यांच्या नेतृत्वात आंदोलन

रोखठोक | पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. आपल्या देशाचे सर्वोत्तम व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या विरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शनिवारी दुपारी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात पाकिस्तानी मंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपा कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहे. ठिकठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचे विधान अत्यंत लज्जास्पद आणि अपमानास्पद आहे. यामुळे भाजपाने या मुद्द्यावर शनिवारी देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर वणीत सुद्धा निदर्शने करण्यात आली.

याप्रसंगी स्थानिक आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, तारेंद्र बोर्डे, रवी बेलूरकर, गजानन विधाते, शुभम गोरे, नीलेश होले, कैलास पिपराडे, निखिल खाडे यांचेसह शेकडो महिला व पुरुष पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
वणी : बातमीदार