Home Breaking News रोहन ने प्राप्त केली MBBS ची पदवी

रोहन ने प्राप्त केली MBBS ची पदवी

1236

अथक परिश्रमाने झाला डॉक्टर

वणी : खऱ्या अर्थाने व्यवसायिकतेचे बाळकडू मिळणाऱ्या घराण्यातील सुपुत्र वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करतो ही बाब निश्चितच आनंददायी आहे. येथील व्यावसायिक राजेश नागदेव यांचा मुलगा रोहन नागदेव याने MBBS अंतिम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण केली असून त्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

रोहन यांचे प्राथमिक शिक्षण वरोरा येथून झाले. त्या नंतर येथील स्वर्णलीला इंटरनॅशन स्कूल मधून पुढील शिक्षण पूर्ण केले. सर्वसामान्यांची आरोग्य सेवा आपल्या हातून घडावी हा संकल्प करत सुरवाती पासूनच डॉक्टर होण्याचे ध्येय रोहन ने उराशी बाळगले होते. आणि त्याच दिशेने त्याने प्रयत्न सुरू ठेवला.

त्याने केलेल्या कठोर परिश्रमा मुळे सन 2017 मध्ये डॉ पंजाबराव देशमुख वैदयकीय महाविद्यालय अमरावती येथे MBBS च्या प्रथम वर्षाला त्याला प्रवेश मिळाला. आणि नुकत्याच लागलेल्या निकाला मध्ये त्याने MBBS ची परीक्षा उत्तीर्ण करून तो डॉक्टर झाला आहे यामुळे नागदेव परिवाराचा आनंद द्विगुणित झाला आहे.

रोहन आपल्या यशाचे श्रेय आई सरला नागदेव, वडील राजेश नागदेव, मोठे वडील भागचंद नागदेव, मोठी आई उषादेवी नागदेव, टोनी धामेचा व दिलीप धामेचा व गुरुजनांसह नागदेव परिवाराला देतो. त्याच्या या यशा मुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे
वणी: बातमीदार