Home क्राईम अकरा लाखाच्या ड्रग्‍ज तस्‍करीचा पर्दाफाश, LCB ची कारवाई

अकरा लाखाच्या ड्रग्‍ज तस्‍करीचा पर्दाफाश, LCB ची कारवाई

● महागडया MD  ड्रग्‍जचा जिल्‍हयात शिरकाव ● 16:50 लाखाचा मुदेमाल हस्‍तगत, तिघे ताब्‍यात

1366

महागडया MD  ड्रग्‍जचा जिल्‍हयात शिरकाव
16:50 लाखाचा मुदेमाल हस्‍तगत, तिघे ताब्‍यात

Crime News Yavatmal | दारव्‍हा तालुक्‍यात MD (Mephedrone)  या घातक ड्रग्‍जची तस्‍करी होत असल्‍याच्‍या गोपनिय माहिती वरुन स्थानिक गुन्हे शाखा (LCB) पथकाने तालुक्‍यातील मानकोपरा या गावात सापळा रचला. चारचाकी वाहनाची झाडाझडती घेतली असता एमडी (MD) अंमली पदार्थासह 16 लाख 47हजार 800 रूपयांचा मुद्देमाल हस्‍तगत करत तिघांना ताब्‍यात घेण्‍यात आले. ही कारवाई गुरुवारी दुपारी  स्थानिक गुन्हे शाखा (LCB) पथकाने केली. Drug trafficking busted, LCB action, three arrested.

जिल्ह्यातील ड्रग्ज शौकिन महागड्या MD (Mephedrone)  या अमली पदार्थाची नशा करतात हे आता उजागर झाले आहे. मुंबईतून या (Synthetic Drugs) अंमली पदार्थाची तस्‍करी करण्‍यात येते. यापुर्वी स्थानिक गुन्हे शाखा (LCB)  पथकाने 15 फेब्रुवारीला यवतमाळ येथील डोर्ली शिवारात तर 13 मार्च ला पांढरकवडा येथे जात असलेल्‍या आरोपीला यवतमाळ बस स्‍थानकांतुन अटक केली होती. आज करण्‍यात आलेली कारवाईत 141 ग्रॅम एमडी ड्रग्‍ज मिळाले असुन ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

युनूस खान अमीर खान पोसवाल (36) लोहारा लाईन पांढरकवडा, वसीम उर्फ राजा खान अक्रम खान (34) पठाण चौक, अमरावती आणि सय्यद इर्शाद उर्फ पिंटू सय्यद गौस (35) बेगम बाजार, अमरावती यांना स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने ताब्यात घेतले. एका चारचाकी वाहन क्रमांक MH-49- B- 7082 या वाहनातुन एमडी अंमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची गोपनिय माहिती (LCB)  पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी मानकोपरा शिवारात सापळा रचला.

स्थानिक गुन्हे शाखा (LCB) पथकाच्‍या दृष्टिपथास वाहन पडताच त्‍यांनी ते थांबवले, वाहनाची झडती घेतली असता डॅश बोर्ड मध्‍ये पांढऱ्या रंगाचे पदार्थ आढळुन आले. ही पावडर एमडी (MD) नावाचा अंमली पदार्थ असल्याची खात्री पटताच पोलिसांनी तिघांना ताब्‍यात घेतले. यावेळी 141.06 ग्रॅम वजनाचे 11 लाख 32 हजार 800 रूपये बाजारमूल्य असलेले एमडी अंमली पदार्थ, चारचाकी वाहन व तीन मोबाईल असा एकूण 16 लाख 47 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदर कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, LCB प्रमुख प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनात API गणेश बनारे, अमोल मुडे, विवेक देशमुख, PSI योगेश रंधे, राहुल गुहे, सुनिल खंडागळे, योगेश डगवार, बंडु डांगे, अजय डोळे, रुपेश पाली, साजीद सैयद,  निलेश निमकर, सुधीर पांडे, निलेश राठोड, ऋतुराज मेडवे, अमीत झेंडेकर, मिथुन जाधव,  रजनिकांत धनराज श्रीरामे, बबलु चव्हाण, नरेश राउत,  जितेंद्र चौधरी व प्रगती कांबळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
ROKHTHOK NEWS