Home वणी परिसर वेकोलीने मोबदला देण्‍याचे नाकारले, 69 शेतकरी हतबल…!

वेकोलीने मोबदला देण्‍याचे नाकारले, 69 शेतकरी हतबल…!

● उच्‍च न्‍यायालयाचा निर्णय शेतकऱ्यांच्या बाजुने

1271
C1 20240404 14205351

उच्‍च न्‍यायालयाचा निर्णय शेतकऱ्यांच्या बाजुने

Wcl news wani | बोरगांव अहेरी येथील शेतकऱ्यांनी वेकोलीकडून जमिनीचा सुधारीत मोबदला मिळावा याकरीता संघटन करुन उच्‍च न्‍यायालयात (High Court) दाद मागीतली. न्‍यायालयाचा निर्णय शेतकऱ्यांच्या बाजुने लागला माञ वेकोली प्रशासनाने सुधारीत दराने जमिनीचा मोबदला देण्‍याचे नाकारले यामुळे 69 शेतकरी हतबल झाले आहे. यातील काही शेतकऱ्यांच्या नैसर्गीक मृत्‍यू झाला तर मोबदला न मिळाल्‍याने एका शेतकऱ्यांने आत्‍महत्‍या केल्‍याचा आरोप अन्‍यायग्रस्‍त शेतकरी संघटनचे अध्‍यक्ष लेखचंद खोकले यांनी केला आहे. The court ruled in favor of the farmers as the wcl administration refused to pay the land at the revised rate.

कोल इंडीया (Coal India) च्‍या अधिनस्‍त असलेल्‍या वेकोलीने वणी उत्‍तर क्षेञातील बोरगाव (अहेरी) येथील 69 शेतकऱ्यांची ओपन कास्ट माईनसाठी 100 एकर शेतजमीन अधिग्रहित केली. 2009 च्‍या सुचने नुसार जुन्याच दरात जमिनींचा कवडीमोल मोबदला देऊन जमिनीचा ताबा घेतला. वेकोली प्रशासनाने केंद्र शासन अधिसुचना क्र. 3822, दि. 19/09/2006 नुसार वेस्टर्न कोल फिल्ड वर्णी नॉर्थ, वणी यांनी ओपन कास्ट माईनसाठी 113.96 हेक्टर जमीन अधिग्रहित केली होती.

शासनाने कोळसा खाणीसाठी संपादित जमिनीसाठी शासन निर्णय 22/08/2012 नुसार पडीक जमीन 6 लाख रू. प्रति एकर कोरडवाहू जमीन 8 लाख रू. प्रति एकर जिरायत जमीन 10 रुपये प्रति एकर नुसार सुधारीत दर ठरविण्यात आले आहे. शासन आदेशात कोळसा खाणी साठी कोल बेअरिंग अॅक्ट 1957 नुसार जमीन अधिग्रहीत करण्यात येत असेल आणि अशा प्रकरणात सदर कायद्यातील कलम 14(1) नुसार कोळसा कंपनी व शेतमालक यांच्यात करार झाला नसेल तर अशा सर्व प्रकरणांना हे दर लागू होतील, असा शासन निर्णय आहे.

बोरगाव (अहेरी) येथील 69 शेतकऱ्यांनी लेखचंद खोकले यांचे अध्यक्षतेखाली बोरगाव (अहेरी) डब्लु.सी.एल. अन्यायग्रस्त शेतकरी संघटन तयार करून हायकोर्टात Write Petition No. 3351 of 2014, Write Petition No. 2236 of 2017 दाखल केले. दि. 28/11/2019 ला हायकोर्टाचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूनी लागला.

न्‍यायालयाच्‍या आदेशाची प्रत वेकोली प्रशासनाला देण्‍यात आली माञ वेकोली प्रशासनाने न्‍यायालयाच्‍या आदेशाची अवहेलना करत सुधारीत मोबदला देण्‍याचे नाकारले. यामुळे मोबदल्‍याच्‍या प्रतिक्षेत शेतकरी देशोधडीला लागले तर सुनील नरुले नामक शेतकऱ्यांने आत्‍महत्‍या केली. वेकोली प्रशासनाच्‍या कृतीमुळेच आत्‍महत्‍या करण्‍यात आल्‍याचा आरोप लेखचंद खोकले यांनी केल्‍यामुळे हे प्रकरण आता नेमके काय वळण घेणार हे बघणे औत्‍सूक्‍याचे ठरणार आहे.
ROKHTHOK NEWS