Home Breaking News तरुणाने गळफास लावून संपवलं आयुष्य

तरुणाने गळफास लावून संपवलं आयुष्य

● आत्महत्येचे कारण अस्पष्ट

1215
C1 20240518 09535002
Img 20240613 Wa0015

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

Sad News | तालुक्यातील वांजरी येथे वास्तव्यास असलेल्या 19 वर्षीय तरुणाने गळफास लावून आयुष्य संपवलं. ही दुर्दैवी घटना शुक्रवार दिनांक 17 मेला सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. A 19-year-old youth ended his life by hanging himself.

ओंकार किशोर लडके (19) असे मृतक तरुणाचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह वांजरी येथे वास्तव्यास होता. घटनेच्या दिवशी तो गावातच होता, सायंकाळी तो घरी गेला व थेट दुसऱ्या मजल्यावर त्याच्या मोठ्या वडिलांच्या खोलीत जाऊन पंख्याला दुपट्टा बांधून गळफास घेतला.

काही वेळाने मोठे वडील आपल्या खोलीत गेले असता त्यांना ओंकार गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी आरडाओरडा केला, नातेवाईकांनी त्याला लगेचच वणी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे स्पष्ट होऊ शकले नाही. पुढील तपास पोलीस करताहेत.
Rokhthok News

C1 20240529 15445424