Home Breaking News धक्कादायक…शिक्षिकेवर चाकू ‘हल्ला’

धक्कादायक…शिक्षिकेवर चाकू ‘हल्ला’

5569
C1 20240404 14205351

हल्ल्याचे कारण गुलदस्त्यात

वणी: तालुक्यातील नायगाव (बु) येथे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेवर 22 वर्षीय माथेफिरूने चाकू हल्ला चढवला. ही घटना गुरुवार दि. 18 ऑगस्ट ला सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास घडली. अवघ्या अर्ध्या तासातच आरोपीला शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वैशाली चल्लावार (40) असे शिक्षिकेचे नाव आहे. वणी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नायगाव (बु) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत आहे. ती आपल्या परिवारासह चंद्रपूरला ये- जा करते. सदर शिक्षिका आपले अध्ययनाचे कार्य पार पाडून शाळा सुटल्यावर आपल्या गावी चंद्रपूर येथे जाण्यासाठी निघाली होती.

नायगाव फाट्यावर ती, बस किंवा अन्य प्रवाशी वाहनाची वाट पाहत असताना अचानक एका माथेफिरू युवकाने तिच्यावर चाकूने हल्ला चढवला. यात तिच्या कानाला जखम झाली आहे. ती जखमी झाल्याचे नागरिकांना कळताच तिला घुग्गुस येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

हल्लेखोर माथेफिरू युवक स्वतः चे नाव राजू अन्सारी सांगत असून त्याचे जवळ नावाबाबत ठोस पुरावा आढळून आला नाही. शिरपूर पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याने चाकू हल्ला का केला हे अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली PSI रामेश्वर कंदुरे पुढील तपास करत आहे.
वणी : बातमीदार

ही बातमी सुध्दा वाचा…

https://rokhthok.com/2022/08/19/17188