Home Breaking News अडीच हजार विद्यार्थ्यांना स्केच पेन व फुगे वाटप

अडीच हजार विद्यार्थ्यांना स्केच पेन व फुगे वाटप

● रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटीचा उपक्रम

214
C1 20240404 14205351

रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटीचा उपक्रम

Wani News | भारताचा 76 वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साह व जल्लोषात साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवा याकरिता रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटीने तब्बल अडीच हजार विद्यार्थ्यांना स्केच पेन व फुगे वाटप करून समाजाप्रती असलेले दायित्व सिद्ध केले. हा छोटेखानी कार्यक्रम टिळक चौक येथे आयोजित करण्यात आला होता. Rotary Club of Black Diamond City proved its commitment to society by distributing sketch pens and balloons to over 2500 students.

रोटरी क्लबच्या वतीने सातत्याने विविध सामाजिक, जनहीतार्थ उपक्रम राबविले जातात. स्वातंत्र्य दिनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित व्हावा याकरिता स्केच पेन व फुगे वाटप करून रोटरी क्लबने आपले कर्तव्य पार पाडले.

याप्रसंगी आशिष गुप्ता, अश्विन कोंडावार यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी अंकुश जयस्वाल, प्रकाश कावडे, अचल जोबनपुत्रा, श्रयेस निखार, नवीन जैन, सुनील चिंडालिया, लक्ष्मण उरकुड़े, मयूर अग्रवाल, हिमांशु बत्रा, मुकेश काठेड, कौस्तुभ लाखे, पुनीत बत्रा, मयूर गेडाम, शुभम जैन, मनीष बत्रा, जितेंद्र फेरवानी यहां सर्व सभासदानी अथिक परिश्रम घेतले.
Rokhthok News