Home Breaking News चोरीची मोटारसायकल, खरेदीदार दोघे, आरोपी पुण्यात

चोरीची मोटारसायकल, खरेदीदार दोघे, आरोपी पुण्यात

● डीबी पथकाने केली शिताफीने अटक

963
C1 20240404 14205351

डीबी पथकाने केली शिताफीने अटक

Wani Crime News | दुचाकी चोरटे तालुक्यात चांगलेच सक्रिय झाले आहेत. संधी मिळताच दुचाकी लंपास करण्यात तरबेज असल्याचे दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात गांधी चौकातून चोरीला गेलेल्या दुचाकीचा छडा लावताना बरीच कसरत करावी लागली. एकाच दुचाकीचे दोन खरेदीदार निघाले. तपासाअंती मोटार सायकल चोरीतील आरोपीला वणी पोलीसांनी पुण्यातुन अटक केली. Wani police arrested the accused in motorcycle theft from Pune.

एप्रिल महिन्यात जैन लेआऊट परिसरात वास्तव्यास असलेल्या मनीष पुरूषोत्तम बोढे यांची पॅशन प्रो मोटारसायकल क्रमांक MH-34-Y- 7179 गांधी चौकातून चोरीला गेली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

दुचाकी चोरी प्रकरणात तपास सुरू असताना कायर येथील अँटो मॅकेनिक हसन शेख शफी (30) यांचेकडे ती दुचाकी मिळाली. त्याला विचारणा केली असता मोहर्ली येथील अर्जुन तांदुरकर याच्या कडून विकत घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी विस्तृत तपास सुरू केला आणि नेमकी दुचाकी कोणी चोरली याचा छडा लावला.

गजानन मधुकर चव्हाण हा या प्रकरणातील दुचाकी चोरटा असल्याचे निष्पन्न झाले. तो मोहर्ली येथे वास्तव्यास होता मात्र मागील चार महिन्यापासून तो पोलिसांना हुलकावणी देत होता. मनमाड, येवला, नाशिक पुणे येथे तो फिरत असल्याने पोलिसांना तो गवसत नव्हता. अखेर पोलिसांनी त्याला पुण्यातून ताब्यात घेतले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बंसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, sdpo गणेश किंद्रे, ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी पथक प्रमुख सपोनि माधव शिंदे, सुदर्शन वानोळे, पंकज उबरकर, हरीन्द्रकुमार भारती, विशाल गेडाम, गजानन कुडमेथे यांनी केली.
Rokhthok News