Home Breaking News त्या..घटनेतील 2 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

त्या..घटनेतील 2 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

1008

पोलिसांचा सावध पवित्रा
प्रकरण कोळसा ट्रक जाळपोळीचे

मुंगोली कोळसा खाणीत रविवार दि.3 ऑक्टोबरला रात्री 9 वाजताच्या दरम्यान 5 अज्ञात आरोपीने कोळशाचा ट्रक जाळला होता. गेल्या 15 दिवसापासून संशयित आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. सोमवारी शिरपूर पोलिसांनी यातील दोघांना घुगूस येथून ताब्यात घेतले आहे.

चड्डा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या MH-34-BG-0862 क्रमांकाचा ट्रक पैनगंगा कोळसा खाणीतुन कोळसा घेऊन घुगूस रेल्वे सायडिंग वर येत असतांना मुंगोली चेक पोस्ट क्र. 2 वर अज्ञात पाच तरुणांनी ट्रक थांबवून चालकाला खाली उतरविले, त्याला धमकी देऊन पेट्रोल शिंपडून ट्रकला आग लावली होती. या आगीत ट्रकचा कोळसा झाला होता.

याबाबत शिरपूर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद करून ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राम कांडूरे यांनी तपासाला सुरवात केली. वेकोली चेक पोस्ट वरील CCTV बंद असल्याने पोलिसांसमोर तपासाला अडचण निर्माण झाली होती.

आरोपी शिरपूर पोलिसांच्या रडारवर येताच पोलिसांनी तेलंगणा राज्यात आरोपीच्या शोधार्थ दोन पथके पाठवली होती. मात्र पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते. दि 18 ऑक्टोबरला संशयित घुग्गुस ला असल्याचे कळताच पोलीस उपनिरीक्षक राम कांडूरे यांनी मोठ्या शिताफीने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

राहुल घोरपडे व शीनु रामटेके रा. घुग्गुस असे ताब्यातील संशयित आरोपींची नावे आहेत. ट्रक जाळपोळ प्रकरणी अज्ञात तरुणांनी सदर गुन्हा का केला याबाबत ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राम कांडूरे पुढील तपास करीत असून अन्य आरोपी टप्प्यात आहेत.

वणी: बातमीदार