Home Breaking News क्षुल्लक वादातून विवाहितेने घेतला ‘गळफास’

क्षुल्लक वादातून विवाहितेने घेतला ‘गळफास’

700
C1 20240404 14205351
● सुर्ला येथील घटना, गावात पसरली शोककळा

सुनील पाटील | पती सोबत अतिशय क्षुल्लक कारणावरून वाद झाला. पती घराच्या बाहेर पडताच त्या 30 वर्षीय महिलेने घराच्या छताला साडीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि. 17 ऑक्टोबर ला घडली.

अर्चना कर्मवीर दूधगवळी (30) असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. ती आपल्या परिवारासह सुर्ला ता. झरी येथे वास्तव्यास होती. नेहमी प्रमाणे ती आपले शेतमजुरीचे काम आटोपून घरी परतली होती. पती घरी नव्हते, ते घरी आल्यावर तिने दुपारी घरातून नेलेल्या 500 रुपयाचे काय केले असे विचारले. यावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्याचवेळी जनावरे आल्याने पती घरच्या बाहेर पडला.

रागाच्या भरात असलेल्या अर्चना हिने तडक घराच्या छताला साडीच्या साह्याने गळफास लावला. ही बाब घरच्या मंडळींना कळताच तिला घोंसा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्या ठिकाणी पुरेशी सुविधा नसल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात आणले.

तपासणी अंती वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. मृतक महिलेला आठ वर्षांची मुलगी आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. पुढील तपास सपोनि ज्ञानेश्वर सावंत व जमादार भालचंद्र मांडवकर करीत आहे.
वणी: बातमीदार