Home वणी परिसर मॅकरून मध्ये बालकदिन उत्साहात साजरा

मॅकरून मध्ये बालकदिन उत्साहात साजरा

156

मॅकरून स्टुडंन्ट्स अकॅडमी (सी.बी.एस.ई ) शाळेत 14 ला स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिवस हा बालकदिन म्हणून खूप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वणी शाखेचा मुख्याद्यापिका शोभना मॅडम या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे मॅकरून प्रायव्हेट आयटीआय चे मुख्याध्यापक दामले हे होते. याप्रसंगी बोलतांना मुख्याध्यापिका म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी मन आणि बुद्धी यांचातील मेळ साधण्याचा प्रयत्न करावा व योग्य तोच निर्णय घ्यावा.

शोभना मॅडम यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. सोबतच चिमुकल्याना काही भेट वस्तू चॉकलेट देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. तसेच शिक्षकांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा सूत्रावे हिने केले तर आभार कुरील यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मॅकरून इंग्लिश मिडीयम स्कूलचे निखिल घाटे, शामली चौधरी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी पुढाकार घेत सहकार्य केले.
वणी: बातमीदार