Home Breaking News क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी, वाहनावर होणार कारवाई

क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी, वाहनावर होणार कारवाई

574
C1 20240404 14205351

वाहतूक विभाग ऍक्शन मोडवर

रोखठोक :- शहरात शालेय वाहनातून क्षमेपेक्षा जास्त विध्यार्थी वाहून नेत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याने वाहतुक विभाग ऍक्शन मोड वर आली आहे. तर शालेय वाहनांची तपासणी सुरू केली आहे.

वणी परिसरात अनेक नामवंत शाळा आहे. या शाळा शहरापासून बऱ्याच लांब अंतरावर असल्याने मुलांना खाजगी शालेय वाहनाने शाळेत जावे लागते. मात्र खाजगी वाहनधारक वाहनांच्या क्षमेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहून नेत असल्याचे निदर्शनास येत आहे.

शासनाने विद्यार्थ्यांची वाहतूकी करिता नियमावली तयार केली आहे मात्र या नियमावलीला तिलांजली दिली जात असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. पाच वर्षा पूर्वी शालेय वाहनाला झालेल्या अपघातात चार चिमुकल्या विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला होता.

शहरातून शालेय ऑटो मध्ये क्षमेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहून नेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे वाहतूक निरीक्षक संजय आत्राम यांनी दि 19 जानेवारीला नांदेपेरा मार्गावरून येणाऱ्या शालेय खाजगी वाहनांची तपासणी केली. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आढळून आल्यास कारवाईची तंबी चालकांना देण्यात आली आहे.
वणी : बातमीदार