Home Breaking News प्रजासत्ताक दिनी आंतर शालेय नृत्य स्पर्धा

प्रजासत्ताक दिनी आंतर शालेय नृत्य स्पर्धा

187
C1 20240404 14205351

प्रेस वेल्फेअर असोसिएशनचे आयोजन

रोखठोक |:– 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील प्रेस वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आंतर शालेय समहू नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा याकरिता या नृत्य स्पर्धेचे आयोजन येथील एस पी एम हायस्कूल रंगमंचावर करण्यात आले आहे. अ व ब अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

दोन्ही गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या शाळांना रंगनाथ स्वामी निधी अर्बन लिमिटेड व श्री लक्ष्मीनारायण सहकरी पतसंस्थेच्या वतीने स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.

प्रेस वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने उत्कृष्ट नृत्यास बाळशास्त्री जांभेकर फिरता करंडक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच प्रभारी शिक्षकांना स्व. ऋषी पिदूरकर यांचे स्मृती प्रित्यर्थ गणेश पिदूरकर यांचे कडून बक्षिसे देण्यात येणार आहे. या स्पर्धेत शहरातील शाळांनी सहभागी होण्यासाठी स्पर्धा संयोजक विनोद ताजने यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन अध्यक्ष रवी बेलूरकर व सचिव तुषार अतकारे यांनी केले आहे
वणी : बातमीदार