Home Breaking News त्याने….विहिरीत उडी मारून संपवले जीवन

त्याने….विहिरीत उडी मारून संपवले जीवन

1287
C1 20240404 14205351

तरुण शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

रोखठोक | मारेगाव तालुक्यातील मांगरुळ येथे वास्तव्यास असलेल्या 31 वर्षीय तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून आपले जीवन संपवले. ही घटना रविवार दि. 19 मार्चला सकाळी उघडकीस आली.

प्रफुल मोरेश्वर खडसे (31) असे मृतकाचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह मांगरुळ या गावी वास्तव्यास होता. त्याचे जवळ असलेल्या कोरडवाहू शेतीच्या भरवश्यावर त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह होत होता. मात्र अस्मानी संकटामुळे आर्थिक घडी विस्कटत गेल्याने तो विवंचनेत होता.

रविवारी सकाळी घडलेल्या घटने बाबत घरच्या मंडळींना कळताच एकच हंबरडा फोडण्यात आला. याप्रकरणी पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू आहे. त्याचे पश्चात आई, पत्नी, भाऊ असा आप्त स्वकीय परिवार आहे.
वणी : बातमीदार