Home Breaking News APMC election… निवडणुकीत आजी – माजी बँक अध्‍यक्षांचा लागणार ‘कस’

APMC election… निवडणुकीत आजी – माजी बँक अध्‍यक्षांचा लागणार ‘कस’

● APMC निवडणुकीत दोन्ही बाजुने तगडे नेते

952
C1 20240404 14205351

APMC निवडणुकीत दोन्ही बाजुने तगडे नेते

रोखठोक | वणी कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या निवडणुकीत दोन्ही बाजुने तगडे नेते एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. पारडे कोणाचे जड हा सघ्‍यस्थितीत गौण मुददा असला तरी खरी मदार सहकार क्षेञावर अवलंबुन आहे. यवतमाळ जिल्‍हा मध्‍यवर्ती बॅकेचे आजी व माजी अध्‍यक्षांचा या निवडणुकीत खरा कस लागणार  आहे. Strong leaders from both sides are going to face each other in the election of wani APMC.

बाजार समितीच्‍या 18 जागे करीता निवडणुक रणसंग्रामात घमासान होणार आहे. भाजपाचे आ. संजीवरेड्डी बोदकुरवार व बॅकेचे माजी अध्‍यक्ष तसेच सहकारातील धुरंधर विनायक एकरे यांचा गट सर्व ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे. तर कॉग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार तथा जिल्‍हाप्रमुख विश्‍वास नांदेकर व बॅकेचे विद्यमान अध्‍यक्ष टिकाराम कोंगरे हे निवडणुकीची खिंड लढवणार आहेत.

बाजार समितीच्‍या निवडणुकीत खऱ्या अर्थाने सोसायटीतुन निवडून येणाऱ्यांचा वरचष्‍मा असतो. 18 जागे पैकी 11 उमेदवार सोसायटी गटातुन निवडून द्यावे लागतात. बाजार समिती निवडणुकीची खरी मदार याच गटावर असल्‍याने बँकेच्या अध्‍यक्षांचा प्रभाव स्‍थानिक पातळीवर असतो. त्‍या प्रमाणेच माजी अध्‍यक्षांचे लक्ष सुध्‍दा सोसायटीतुन लढणाऱ्या उमेदवारांवरच स्थिरावलेले असणार आहे.

तालुक्‍यात भाजपाची ताकद निर्विवाद आहे परंतु महाविकास आघाडी संयुक्‍तपणे लढत देत असल्‍याने बाजार समितीची निवडणुक रंगतदार होणार आहे. ग्रामपंचायतीचे चार उमेदवार व व्‍यापारी- हमाल गटाचे तीन उमेदवार आपल्‍याच गटातुन विजयी करण्‍याची कवायत दोन्‍ही पॅनलला करावी लागणार आहे. बाजार समितीच्‍या 18 जागेकरीता 94 उमेदवारी अर्ज दाखल करण्‍यात आले होते. यातील किती उमेदवार माघार घेतात त्‍यानंतरच खरे चिञ स्‍पष्‍ट होणार आहे.
वणी: बातमीदार