Home Breaking News दुःखद….दुचाकीला अपघात, होतकरु युवक ठार

दुःखद….दुचाकीला अपघात, होतकरु युवक ठार

2303

भालर मार्गावरील घटना

वणी :-येथील एका वॉटरप्लांट मध्ये काम करणाऱ्या युवकाच्या दुचाकीला अपघात झाला. यात त्याचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना बुधवार दि. 18 मे ला सायंकाळी घडली.

विनोद जगताप (34) रा.पटवारी कॉलनी असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तो छोरिया लेआऊट मध्ये असलेल्या वॉटरप्लांट मध्ये चालक म्हणून काम करीत होता.

बुधवार दि 18 मे ला साय 7 वाजताचे सुमारास तो दुचाकीने भालर येथे गेला होता. वणी कडे परत येत असतांना त्याच्या दुचाकीला अपघात झाला. त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला आहे. नेमका अपघात कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
वणी : बातमीदार