Home वणी परिसर Wcl महाप्रबंधक कार्यालयात “तो ” करणार आत्‍महत्‍या…!

Wcl महाप्रबंधक कार्यालयात “तो ” करणार आत्‍महत्‍या…!

● wcl चा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर ● शेतकऱ्याने दिलेल्‍या निवेदनाने खळबळ

840
C1 20240404 14205351

wcl चा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर
शेतकऱ्याने दिलेल्‍या निवेदनाने खळबळ

Wcl news wani | वेकोली प्रशासनाचा अनागोंदी कारभार सातत्‍याने चव्‍हाटयावर येतांना दिसतोय. 8 महिन्‍यांपासुन लाठी या गावातील शेतकरी वेकोलीच्या डम्पिंग मुळे शेतात पाण्‍याच्‍या प्रवाहाने खड्डे पडले ते बुजविण्‍याची मागणी करतोय. माञ मुजोर प्रशासन ऐकण्‍याच्‍या मानसिकतेत नाही. यामुळे दि. 21 मे ला चक्‍क महाप्रबंधक कार्यालयातच विष पिण्‍याचा ईशारा त्‍या पिडीत शेतकऱ्याने निवेदनातुन दिल्‍याने चांगलीच खळबळ माजली आहे.The farmers are demanding that the ditches created by the water flow in the fields due to the dumping of wcl should be filled.

लाठी येथील शेतकरी प्रभाकर लक्ष्मण खारकर यांचे उकणी खंड 1 मधील गट क्र 569/2 हे शेत आहे. वेकोलीच्‍या ढिसाळ धोरणाचा फटका शेतकऱ्याला बसला आहे. लगतच वेकोलीचे डम्पिंग असल्‍यामुळे पाण्‍याचा नैसर्गीक प्रवाह अडला. मागील पावसाळयात अडलेले ते पाणी शेतकऱ्यांच्या शेतातुन प्रवाहीत झाले, यामुळे शेतात मोठ मोठया नाल्‍याच निर्माण झाल्‍या आहेत.

पिडीत शेतकरी खारकर यांनी वेकोलीच्‍या कृतीमुळेच शेतात पडलेल्‍या नाल्‍या बुजवून जमिनीची समांतर पातळी करावी अशी मागणी मागील 8 म‍हिन्‍यांपासुन महाप्रबंधक (GM) ऑफिस व उकणी सबेरिया ऑफिस कार्यालयात करताहेत. वेळोवेळी चर्चा व निवेदने देण्‍यात आली माञ वेकोली प्रशासनाकडून कोणतीच दखल घेण्‍यात आलेली नाही. खरीप हंगाम जवळ येत असतांना सुध्‍दा कोणतीच हालचाल होत नसल्‍याने त्‍यांनी महाप्रबंधक कार्यालयातच विष प्राशन करण्‍याचा निर्णय घेतला.

शेतकऱ्याने वेकोली प्रशासनाला निवेदन देत 20 मे पर्यंतचा अल्‍टीमेटम क्षेत्रीय महाप्रबंधक यांना दिलेला आहे. शेतात पडलेल्या नाल्‍यांना माती टाकून बजवावे अन्‍यथा 21 मे ला दुपारी 12 वाजता महाप्रबंधक कार्यालयात आत्महत्या करण्यात येईल असे निवेदनात नमुद करण्‍यात आले आहे. या सर्व घटनेला संबंधित प्रशासन जबाबदार असेल असे स्‍पष्ट करण्‍यात आले आहे. पि‍डीत शेतकऱ्याने वेकोली प्रशासनाला दिलेल्‍या निवेदनामुळे चांगलीच खळबळ माजली असुन वेकोली प्रशासन काय निर्णय घेणार याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.
Rokhthok News