Home क्राईम दणदणीत….. 22 जुगारी ताब्‍यात, 58 लाखाचा मुद्देमाल जप्‍त

दणदणीत….. 22 जुगारी ताब्‍यात, 58 लाखाचा मुद्देमाल जप्‍त

● LCB ची पांढरकवडा येथे जुगार अड्डयावर दणदणीत कारवाई

1411

LCB ची पांढरकवडा येथे दणदणीत कारवाई

Crime News Pandharkavda | स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्या (LCB) प्रमुखांना ‘टीप’ मिळाली. पथकाने पांढरकवडा येथील संतोषी माता मंदीरालगत उदय नवाडे यांच्‍या घराच्या बंद खोलीत बिनधास्त सुरु असलेल्या जुगार अड्डयावर धाडसत्र अवलंबले. 22 जुगाऱ्याना ताब्यात घेत 58 लाखाचा मुददेमाल जप्‍त करण्यात आला. ही दणदणीत कारवाई रविवार दि. 18 जूनला करण्यात आली. The police raided the gambling den, which was going on unmolested in a closed room.

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अधिनस्त अधिकाऱ्यांना आदेशीत करून जिल्ह्यातील अवैद्य धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे अधिकाऱ्यांनी आपल्या गोपनीय महितगारांची यंत्रणा सतर्क केल्यानेच जिल्ह्यातील गुन्ह्यांचा पर्दाफाश होत आहे.

पांढरकवडा येथील संतोषी माता मंदीराजवळील एका घरात नेहमीच मोठया प्रमाणात जुगार चालतो अशी माहिती स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे प्रमुख प्रदीप परदेशी यांना मिळाली. या जुगार अड्डयावर जिल्‍हा व परजिल्ह्यातील तरबेज जुगाऱ्यांचा राबता असायचा. खुलेआम व बिनधास्‍त सुरू असलेल्‍या जुगार अड्डयावर अखेर पोलीसांनी धाडसत्र अवलंबले.

या कारवाईत गब्‍बर मोटेखां पठाण, रणजित चव्हाण, ईश्‍वर ठाकरे, आदिल हुसेन पासवाल, शालेंद्र चव्हाण, आवेज शकील अंसारी, शुभम राय, मो. मकसूद मो. मन्सूर, स. जिब्राईल स. इब्राहिम, सचिन मुद्यलवार, प्रियम राय, शिनु झुपाका, मिथुन चावरे, शे. आसिफ शे. चांद, साहील शफाक शेख, शकील शेख चांद, प्रमोद भोयर, आकाश बोरले, आकाश तिवारी, गणेश आस्‍वले, आशिष बहुरीया, हाफिजुर रहेमान या जुगाऱ्याना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला.

या कारवाईत 18 लाख 11 हजार 500 रोकड, 15 नग मोबाईल संच 3 लाख 30 हजार 500 रूपये,  3 नग ताश पत्‍ते 300 रूपये, 6 नग गाद्या 300 रूपये, 3 चार चाकी वाहने  37 लाख रूपये असा एकुन 58 लाख 44 हजार 800 रूपयांचा मुददेमाल जप्‍त करण्‍यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ.पवन बनसोड (dr. Pavan bansod), अप्‍पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप (piyush jagtap) यांच्‍या मार्गदर्शनाखाली स्‍थानिक गुन्‍हे शाखचे पोलीस निरीक्षक प्रदिप परदेशी PI विवेक देशमुख,  PSI राहुल गुहे, बंडु डांगे, सय्यद साजिद, अजय डोळे, रूपेश पाली, विनोद राठोड, निलेश राठोड, रितुराज मंडवे, धनंजय श्रिरामे, अमित कुमरे  यांनी केली.
Rokhthok News