Home Breaking News महिलांनी सोमय्याच्‍या प्रतिमेला मारले जोडे

महिलांनी सोमय्याच्‍या प्रतिमेला मारले जोडे

● कॉग्रेसच्‍या महिला कार्यकर्त्‍या आक्रमक ● घाणेरड्या कृत्याचा निषेध

1102

कॉग्रेसच्‍या महिला कार्यकर्त्‍या आक्रमक
घाणेरड्या कृत्याचा निषेध

Wani News | भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांचा घाणेरडा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिला वर्गात संतापाची लाट उसळली आहे. बुधवारी सकाळी 11 वाजताच्‍या दरम्‍यान येथील टिळक चौकात कॉग्रेस पक्षाच्‍या महिला कार्यकर्त्‍यांनी सोमय्याच्‍या प्रतिमेला जोडे मारुन निषेध व्‍यक्‍त केला. There is a wave of anger in the women’s section.

जिल्‍हा कॉग्रेसच्‍या महिला अध्‍यक्षा वंदना आवारी यांचे नेतृत्‍वात महिलांनी घाणेरड्या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करून त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले. यावेळी महिला कार्यकर्त्‍यामध्‍ये प्रचंड संताप दिसून येत होता. किरीट सोमय्या कोणत्या प्रवृत्तीचा माणूस आहे हे त्याच्या कृतीवरुन सिध्‍द झाले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांचे नागडे उघडे व्हिडिओज सगळीकडे व्‍हायरल होत आहेत, भाजपा आणि भाजपाचे नेते युवा पिढीला ह्यातून काय संदेश देत आहेत. भाजपा नेत्यांचे हेच घाणेरडे संस्कार आहेत काय, असा सवाल निवेदनातुन व्‍यक्‍त करण्‍यात आला आहे.

राज्‍याचे गृहमंञी यांनी अश्‍लीलता पसरवणाऱ्या विकृत व्‍यक्‍ती विरोधात ठोस कारवाई करणे अपेक्षीत आहे. भाजपा चा एक नेता संपूर्ण महाराष्ट्राची तरूण पिढी नासवतोय. अश्‍लील, घाणेरडे कृत्‍य करतोय त्‍याचेवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी कॉग्रेस पक्षाच्‍या महिला कार्यकर्त्‍यांनी निवेदनातुन केली आहे.

याप्रसंगी संध्‍या बोबडे, सविता ठेपाले, साधना गोहोकार, शारदा ठाकरे, कविता चटकी, संगीता खाडे, उज्‍वला दोडके, प्रमिला पावडे, माया गाडगे, वंदना धगडी, शालीनी रासेकर, विजया आगबत्तलवार, ललीता बरशेटटीवार, माया जयपुरकर यांचेसह मोठया प्रमाणात महिला कार्यकर्त्‍या उपस्थित होत्‍या.
ROKHTHOK NEWS