Home Breaking News सार्वजनिक महिला समाजच्या अध्यक्षपदी शालिनी गंगशेट्टीवार

सार्वजनिक महिला समाजच्या अध्यक्षपदी शालिनी गंगशेट्टीवार

● सर्वानुमते नवनिर्वाचित अध्‍यक्षांची निवड

339

सर्वानुमते नवनिर्वाचित अध्‍यक्षांची निवड

Wani News | सार्वजनिक महिला समाजाची 2023-24 साठी नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. या वर्षीची पहिली सर्वसाधारण सभेची सुरूवात अधिक मासानिमीत्त किर्ती कोंडावार यांच्या पुढाकाराने गीतेच्या 15 व्या अध्यायाचे पठण करण्यात आले व श्री. गजानन माऊलींचा “गण गण गणात बोते” या पवित्र मंत्राने यावर्षीच्या नवीन कामकाजाची सुरूवात करण्यात आली. A new Executive Committee of the Public Women’s Society was formed for 2023-24.

याप्रसंगी पदाधिकारी, सल्लागार, आमंत्रित तसेच कार्यकारिणीची सदस्य निवड करण्यात आले. नवीन कार्यकारिणी निवड सभेचे अध्यक्ष निलीमा काळे, प्रमुख अतिथी सा.म. समाजाच्या माजी अध्यक्ष, आमंत्रित सदस्य कविता सुरावार होत्या. सर्वानुमते नवनिर्वाचित अध्यक्ष शालिनी चं. गंगशेट्टीवार यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष भावना गंगमवार, सचिव स्वप्ना पावडे, सहसचिव- माधुरी कोंडावार, कोषाध्यक्ष- स्नेहलता चुंबळे यांची निवड करण्यात आली. सल्लागार निलीमा काळे, भारती कोलप्याकवार, किर्ती कोंडावार, शुभांगी सुरावार, विणा खोब्रागडे यांची निवड करण्यात आली. तसेच आमंत्रित सदस्य म्हणून अपेक्षा गादेवार, माया गौरकार, छाया उपलेंचवार, कविता सुरावार यांची निवड करण्यात आली.

नविन कार्यकारिणी मध्ये सुजाता ताटेवार, निलीमा सुरावार, अमिता गंजीवार, चित्रा गंगशेट्टीवार, प्रिती ताटेवार, शुभदा मुत्यलवार, सारिका येरावार, मृदुला झिलपीलवार, राजश्री पांडे, सोनल पांपट्टीवार, रजनी हिकरे, आशा चिद्दरवार, ज्योती कोंडावार. यांची निवड करण्यात आली. नव्यानेच तयार करण्यात आलेल्या नियम व अटी सांगण्यात आल्या तसेच सा.म.समाजाचा संपूर्ण इतिहास यावेळी सांगण्यात आला.

आयोजित कार्यक्रमांत आभार प्रदर्शन भावना गंगमवार यांनी केले. यानंतर वडाचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षा म्‍हणाल्‍या की,  वटवृक्षाप्रमाणेच सार्वजनिक महिला समाजाची उन्नती होईल यात शंकाच नाही. अध्यक्ष म्हणून घेतलेली जबाबदारी उत्तम पार पाडीन व समाजाच्या, महिलांच्या कल्याणा साठी नवनविन उपक्रम घेईल असे मनोगत व्यक्त केले.
Rokhthok News