Home Breaking News Raas Dandiya | ‘रुचिता’ने जिंकली सायकल

Raas Dandiya | ‘रुचिता’ने जिंकली सायकल

● जैताई माता दांडिया उत्सव समितीचे आयोजन

925
C1 20231019 11333049
C1 20240404 14205351
जैताई माता दांडिया उत्सव समितीचे आयोजन

Wani News | शहरात नवराञोत्सव धडाक्‍यात साजरा होतोय, दांडीया नृत्‍यांने तरुणाईत जल्‍लोष संचारला आहे. जैताई माता दांडिया उत्सव समितीच्‍या वतीने “रास दांडिया” गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बक्षिसांची लयलूट केल्‍या जात असुन रुचिता जुनेजा हिने सायकल पटकावली आहे तर अनेकांना प्रोत्‍साहनपर बक्षीसे दिल्‍या जात आहे. Ruchita Juneja has won the bicycle.

C1 20231019 11342741

शहरातील छञपती शिवाजी महाराज उद्यान येथे 23 ऑक्टोबर पर्यंत दांडिया उत्सवाचा जल्‍लोष असणार आहे. शहरातील तरुणाई संगीतांच्‍या तालावर थिरकतांना दिसत आहे. गरबा दांडीयात सहभागी होणाऱ्या स्‍पर्धकांना दररोज बक्षिसे दिली जात आहे. या रास दांडीया स्‍पर्धेत सव्‍वा लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्‍यात आली आहे.

C1 20231019 11340425

विजय चोरडिया, तारेंद्र बोर्डे, जेसीआय वणी सीटी,  कशिश फिटनेस क्लब यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने रास दांडीया उत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले आहे. ही रास दांडिया स्पर्धा तीन गटात असणार आहे. यात अ गट हा 15 वर्षांपुढील तरुणींचा,  ब गट हा 15 वर्षांपुढील तरुणांचा तर क गट हा 7-15 वर्षातील मुला- मुलींसाठीचा आहे.

C1 20231019 11330452

रास दांडीया स्पर्धेत दररोज 2 लकी विजेत्याला सायकल,  प्रत्येक गटातील 1 विजेत्याला चांदीचे नाणे जिंकता येणार आहे. तर सुपर बपंर प्राईज म्हणून “होन्डा ऍक्टिव्हा” पटकवता येणार आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशासाठी पास गरजेचा असून सिंगल तरुणींसाठी 150 रुपये, तर कपल एन्ट्री पास 250 रुपये तर संपूर्ण कुटुंबासाठी (5 व्यक्ती) 400 रुपयांचा पास आहे. या उत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Rokhthok News