Home Breaking News थरार…तरुणाचे अपहरण आणि गळा आवळून ‘हत्या’

थरार…तरुणाचे अपहरण आणि गळा आवळून ‘हत्या’

1668

48 तासात हत्येचा उलगडा
6 आरोपी अटकेत,

सोमवारी रात्री 5 ते 6 अनोळखी इसमाने घरात प्रवेश केला. घरगुती कापड्यावरच असलेल्या 34 वर्षीय व्यक्तीला बळजबरीने चारचाकी वाहनात कोंबले. तोंडाला दुपट्टा बांधून अपहरण करण्यात आले. वाटेतच जबर मारहाण करून गळा अवळण्यात आला आणि याच झटापटीत त्याचा मृत्यू झाला. मृतदेह वर्धा नदीपात्रात फेकून काम फत्ते झाल्याच्या अविर्भावत आरोपी पसार झालेत.

कळंब तालुक्यातील तिरझडा या गावात वास्तव्यास असलेल्या सुरेश श्यामराव पवार (34) याचे अपहरण करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी मृतकाची पत्नी शालीनी सुरेश पवार (25) यांनी कळंब पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली होती.

सुरेशची हत्या का करण्यात आली याबाबत पोलिसांना धागेदोरे गवसत नव्हते. घटनेचे गांभीर्य बघता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी सदर प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप परदेशी व स्थानिक गुन्हे शाखा पथकाला दिले होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून अपहरण करणारे इसम कोण व ते कोणत्या वाहनाने घटनास्थळी आले तसेच अपहरण झालेल्या तरुणाचे अलीकडील काळात काही वाद किंवा भांडण होते काय ? याबाबत स्थानिक स्तरावर तपास कौशल्याचा व इंन्ट्रॉगेशन स्कील चा वापर करत नातेवाईकाना विचारपुस केली असता हत्येचा धागा गवसला.

सुरेश पवार हा आरोपींच्या नात्यातील एका मुलीला त्रास देत होता. समज देऊनही सुरेशचे वर्तन सुधारले नाही. उलट त्याने आरोपीलाच धमकावले. त्यामुळे सुरेशला अद्दल घडविण्यासाठी आरोपींनी पांढरकवडा येथून कार घेतली व सोमवारी रात्री सुरेशला वाहनात डांबले. वाहनातच आरोपींनी सुरेशला मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला. आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा अवघ्या 48 तासात केला. सुनील कवडू कुचनकार (23) रा. साखरा ता. केळापूर, विजय कवडू कुचनकार (32) रा. साखरा, विशाल सवाईराम जाधव (35) रा. साखरा, अमोल धर्मदास नळे (40) रा. धोंडसी, नीतेश राजू कुचनकार (32) रा. पांढरकवडा, गणेश भीमराव आत्राम (28) रा. ताडउमरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. या व्यतिरिक्त इतर दोन आरोपींची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, सहा. पोलीस अधीक्षक आदित्य मीरखेलकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक अजित राठोड, जगदीश मंडलवार यांच्या नेतृत्वात स.पो.नि विवेक देशमुख, पोउपनि योगेश रंधे, स.पो.नि. अभय चौधनकर, पोउपनि किशोर मावस्कर, पोउपनि संदिप बारंगे, पोउपनि निलेश गायकवाड, बंडू डांगे, बबलु चव्हाण, उल्हास कुरकुटे, निलेश राठोड, सलमान शेख, किशोर झेंडेकर, प्रफुल दळवी, राजु मोहले, वसंता चव्हाण, आकाश मसलकर, छंदक मनवर, सचीन काकडे यांचे पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.
यवतमाळ: बातमीदार

Previous articleआदर्श सरपंच पेरे पाटील सोमवारी वणीत
Next articleदिवाळी अंक प्रदर्शनी चे आयोजन
Whatsapp Image 2021 07 18 At 1.43.51 Pm (1)
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.