Home वणी परिसर दिवाळी अंक प्रदर्शनी चे आयोजन

दिवाळी अंक प्रदर्शनी चे आयोजन

150
Img 20240613 Wa0015

प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन

मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाचे सभागृहात दिवाळी अंक प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले आहे. वाचक मित्रांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

या प्रदर्शनीचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष रतनचंद पारसमल सुराणा यांचे हस्ते करण्यात आले. सर्व प्रथम सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन करून व फीत कापण्यात आली.

या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष केशव नामदेव भोयर, ग्राम पंचायत कुंभा चे उपसरपंच गजानन मारोती ठाकरे, सचिव विनोद चंपालाल भन्साळी, प्रभाकर किनाके, मंगेश भेदूरकर, अंकित चौधरी, आशिष घोटेकर तथा गावातील नागरिक बंधू व वाचक प्रेमी, विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर दिवाळी अंक प्रदर्शनी दिनांक 18 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर पर्यंत वाचनालयीन वेळेत सुरू राहील. करिता परिसरातील वाचक प्रेमीनी या दिवाळी अंक प्रदर्शनी चा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन ग्रंथपाल गजानन कोकुडे यांनी केले दिवाळी अंक प्रदर्शनीच्या यशस्वी ते साठी लिपिक दिवाकर कावडे, ललित पडोळे यांनी परिश्रम घेतले
कुंभा: बातमीदार

C1 20240529 15445424
Previous articleथरार…तरुणाचे अपहरण आणि गळा आवळून ‘हत्या’
Next articleवाघाने पाडला बकरीचा ‘फडशा’
Rokhthok News
वणी परिसरातील बित्तंबातमी ‘रोखठोक‘ न्युज पोर्टल च्या माध्यमातुन पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. खोडसाळ व हेतू परस्पर बातम्या लिखाणाचा आमचा पिंड नाही. सत्य ते जनते समोर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, विकासात्मक विषयावरिल बातम्या हाताळण्याचा आम्ही प्रयत्न करु सोबतच बातमी मागील बातमी शोधून जनहितार्थ वृत्त संकलन हाच आमच्या न्यूज पोर्टलचा उद्देश असणार आहे.