Home Breaking News Crime : जुने बसस्‍थानक परीसर बनला गुंडाचा अड्डा

Crime : जुने बसस्‍थानक परीसर बनला गुंडाचा अड्डा

● अवैध व्‍यवसायाचे ठरताहेत केंद्रबिंदू

1464
C1 20231119 18193480

अवैध व्‍यवसायाचे ठरताहेत केंद्रबिंदू

Wani Crime News | शहरातील जुने बसस्‍थानक परिसरात कमालीची गुंडागर्दी वाढली आहे. शनिवारी राञी क्षुल्‍लक कारणावरुन एका हॉटेल मध्‍ये प्रचंड हाणामारी झाली. मारहाण झालेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या तक्रारीवरुन पोलीसांनी दोघांवर विविध कलमान्‍वये गुन्‍हा नोंद केला आहे. माञ शहरात वाढत चाललेली अनागोंदी दुर कोण करणार हा प्रश्‍न अनुत्‍तरीत आहे. The police have registered a case against both of them under various sections.

शहरातील जुने बसस्‍थानक सध्‍यस्थितीत अवैध धंद्याचे माहेरघर झालेले आहे. मटका, जुगार, प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु आणि राञी उशीरापर्यंत चालणारे हॉटेल कायदा व सुव्‍यवस्‍था बिघडविण्‍यास कारणीभुत ठरताहेत. अवैध व्‍यवसायीक शिरजोर झालेले आहेत, पोलीस दप्‍तरी नोंद असतांनासुध्‍दा बिनधास्‍त आपले अवैधधंदे पुर्णत्‍वास नेतांना दिसत आहे. पोलीस त्‍या अवसानघातकी प्रवृत्‍तींना ढिल का देतात हा संशोधनाचा विषय आहे.

जुने बसस्‍थानक परिसरातील क्‍वालीटी रेस्‍टॉरन्‍ट मध्‍ये सुदामा साधवानी व दिपक वाधवानी गप्‍पा मारत होते. त्‍याच वेळी सुधिर पेटकर त्‍याच्‍या एका साथीदारासह जेवन करत होते. त्‍यांनी सुदामाला जेवण करण्‍यास बोलावले. याच क्षुल्‍लक कारणावरुन वादावादी झाली आणि हाती येईल त्‍या वस्‍तुने मारहाण करण्‍यात आली.

यामुळे सुदामा यांनी घराच्‍या दिशेने पळ काढला. ते दोघे सुदामाचा पाठलाग करत त्‍याचे घरापर्यंत पोहचले. त्‍याला घरातुन बाहेर काढत मारहाण करण्‍यात आली. यादरम्‍यान सुदामाचा लहान भाऊ व पुतण्‍या भांडण सोडविण्‍यासाठी आले असता त्‍यांना देखील आरोपींनी मारहाण केली तसेच सुदामाच्‍या हातातील अंगठी हिसकावुन घेतल्‍याचा आरोप तक्रारीतुन करण्‍यात आला आहे.

मारहाणीच्‍या घटनेनंतर तक्रारदार व आरोपी वणी पोलीस स्‍टेशनमध्‍ये पोहचले. त्‍यावेळी सिंधी कॉलनीतील 40 ते 50 तरूण पोलीस स्‍टेशन समोर एकत्र जमले व आरोपींवर तातडीने गुन्‍हा नोंद करावा अशी मागणी लावुन धरत ठिय्या मांडला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

शहरात पोलीसांचा गुन्‍हेगारांवरील वचक संपुष्‍ठात आल्‍याचे दिसत आहे. अवैध धंदयावर अंकुश लावण्‍यात पोलीसांना अपयश येत आहे. सुगंधीत तंबाखुची अवैध तस्‍करी आणि मटका जुगार याचे वाढलेले प्रस्‍थ भविष्‍यात धोकादायक ठरणार आहे. पोलीसांनी वेळीच सावध होण्‍याची गरज निर्माण झालेली आहे अन्‍यथा कायदा व सुव्‍यवस्‍था बिघडली तर दोष कोणाला द्यायचा असा प्रश्‍न उपस्थित होणार आहे.
Rokhthok News