Home Breaking News CRIME NEWS | व्‍वा.. यालाच म्‍हणतात कोंबड बाजार

CRIME NEWS | व्‍वा.. यालाच म्‍हणतात कोंबड बाजार

● घोन्‍सा शिवारात जुगाऱ्यांचा माहोल ● पोलीस प्रशासन व LCB माञ अनभिज्ञ

1319
C1 20231119 17255577

घोन्‍सा शिवारात जुगाऱ्यांचा माहोल
पोलीस प्रशासन व LCB माञ अनभिज्ञ

WANI CRIME NEWS | उपविभागात शेतकऱ्यांचे पीक बाजारात आले की, कोंबड बाजाराचे पीक येणार हे स्‍पष्‍ट होते. मारेगांव नंतर कोंबड बाजार भरवणाऱ्यानी मुकूटबन पोलीसांच्‍या हद्दीत शिरकाव केला आहे. घोन्‍सा शिवारातील झरी मार्गावर जंगल सदृष्‍य भागात रविवारी जुगाऱ्यांचा माहोल होता. यालाच कोंबड बाजार म्‍हणतात असे बोलल्‍या जात असले तरी पोलीस प्रशासन व lcb अनभिज्ञ कसे हे कळायला मार्ग नाही. After Maregaon, those who run the “kombad bazar” have entered the Mukutban police area

शेतकऱ्यांच्या शेतातील पीक बाजारात आले की पैशाची चंगळ असते. हाच धागा हेरून अवैद्य धंद्यातील काही मातब्बर कोंबड बाजार भरवतात. यासाठी पोलीस प्रशासनाची ‘मूकसंमती’  गरजेची असते. मंगळवार,  बुधवार, शुक्रवार व रविवारी भरणाऱ्या या बाजाराला जत्रेचे स्वरूप येते.

 LCB (स्थानिक गुन्हे शाखा पथक) कुचकामी 
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अवैद्य धंद्यावर वचक बसावा असे आवाहन केले आहे. मग बिनधास्‍तपणे कोंबड बाजार का व कसा चालवला जातो हे न उलगडणारे कोडे आहे. मुकूटबन हददीत रविवारी भरलेल्या कोंबड बाजाराला कोणाची संम्‍मती होती हे तपासणे गरजेचे आहे. त्‍यातच अनेक बारीकसारीक बाबी स्थानिक गुन्हे शाखेला माहित असतांना घोंसा परिसरातील झरी मार्गावर भरलेल्‍या कोंबड बाजारावर धाड का मारण्‍यात आली नाही हा संशोधनाचा विषय आहे.

कोंबड बाजारात जुगाराचे अनेक प्रकार खेळले जातात,  कोंबड्याच्या झुंजी लावून हारजित केल्या जाते तर जुगाराचा “चेंगड” हा प्रकार विशेषत्वाने खेळल्या जातो. यात जुगारी आपल्या वर्षभराची कमाई हरतो आणि त्याचा परिवार उघड्यावर येत असल्याचे वास्तव सर्वश्रुत आहे.

लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या या अवैद्य धंद्यात पोलिसांचा आशीर्वाद गरजेचा असतो अन्यथा धाडसत्र ठरलेले असते. मारेगाव तालुक्यात गोदनी शिवार, आयटीआय परिसर, लाखापुर अशा जंगल सदृष्‍य भागात तसेच आता तर मुकूटबन परिसरात दहेगांव परिसरातील झरी मार्गावर कोंबड बाजार भरविण्‍यात येतो हे जगजाहीर झाले आहे. अद्याप वणी व शिरपुर पोलीस हद्दीत कोंबडबाजार भरवणाऱ्यांचा शिरकाव झाला नाही.
Rokhthok News