Home Breaking News भव्य मोर्चात उंबरकरांनी शासनावर डागली ‘तोफ’

भव्य मोर्चात उंबरकरांनी शासनावर डागली ‘तोफ’

2809

मोर्चात हजारो शेतकरी सहभागी

रोखठोक | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी “आर या पार” मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी हजारोच्या संख्येने निघालेल्या मोर्च्यांचे रूपांतर शिवतीर्थावर सभेत झाले. यावेळी आपल्या घणाघाती भाषणात, बोलताना उंबरकरानी शासनावर चांगलीच तोफ डागली.

काही दिवसातच विदर्भात दीड हजारच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, ओला दुष्काळ असूनंही पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली तर दिवसा वीज मिळत नसल्याने रब्बी हंगामंही संकटात असताना राज्य सरकार निद्रिस्त आहे. शिंदे-फडणवीस सरकारला जागे करण्यासाठी मनसेने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ‘आर या पार’ मोर्चाचे आयोजन केले होते.

याप्रसंगी बोलताना उंबरकर म्हणाले की, पंधरा दिवसात सरकारने शेतकरी हिताचे प्रश्न तातडीने मार्गी लावावे. तसेच परिसरातील स्थापित उद्योगधंद्यांनी भूमी पुत्रांना रोजगार द्यावा अन्यथा “आर या पार” पार्ट 2 यापेक्षा अधिक आक्रमक असेल असे भाकीत केले. तर दुसरा टप्पा आमदारांच्या घरावरच असेल असे स्पष्ट केले.

शेतकरी हितासाठी शुक्रवारी भव्य “आर या पार” मोर्च्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उंबरकर यांनी आपल्या आक्रमक शैलीत सरकारला धारेवर धरले. “शेतकऱ्यांनो आता जीव द्यायचा नाही तर शासनाचा जीव घ्यायचा” असे उपस्थितांना चेतवले. यावेळी वणी, मारेगाव व झरी येथील मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी: बातमीदार