Home Breaking News त्या… तरुणाने का घेतला गळफास…!

त्या… तरुणाने का घेतला गळफास…!

1519

● शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

सुनील पाटील | शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुनवट येथे अवघ्या 30 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि.20 फेब्रुवारीला दुपारी उघडकीस आली.

अमरदिप दिलीप पाटील (30) असे दुर्दैवी मृतक तरुणाचे नाव आहे. तो आपल्या परिवारासह पुनवट येथे वास्तव्यास होता. दुपारी घराच्या छताला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्याच्या पत्नीने हंबरडा फोडला. रडण्याचा आवाज येत असल्याने शेजारी जमा झाले आणि ही बाब पोलिसांना कळवण्यात आली.

परिसरात तरुणांच्या आत्मघाताचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. नैराश्य व आर्थिक चणचण प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे प्रामुख्याने दिसत आहे. अमरदिप या होतकरू तरुणाने जीवन का संपवले हे अद्याप अस्पष्ट असून आई वडिलांचा एकुलता एक आधार संपुष्टात आला आहे.

मृतक अमरदिप हा एकुलता एक मुलगा होता, त्याला चार वर्षाची मुलगी आहे. घटनेच्या दिवशी आई-वडील शेतात गेले होते. त्याने असे आत्मघाती पाऊल का उचलले हे कळायला मार्ग नसून त्याचे पश्चात मोठा आप्त परिवार आहे. या घटनेचा तपास पोलीस करत असून त्याने जीवन का संपवले हे कालांतराने स्पष्ट होणार आहे.
वणी: बातमीदार