Home वणी परिसर धमाल हास्यरंगात चिंब भिजले मारेगावकर

धमाल हास्यरंगात चिंब भिजले मारेगावकर

406

“कार्यक्रम असा..की पोटभर हसा..

मारेगाव: ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखेच्या वतीने स्व.प्रा.डॉ.माणिकराव ठिकरे यांचे स्मूर्ती प्रित्यर्थ “कार्यक्रम असा..की पोटभर हसा.. या धमाल हास्यकलोळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धुलीवंदनाच्या दिवशी पार पडलेल्या या धमाल हास्यरंगात मारेगावकर न्हावून निघालेत. आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार तर अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ईझहार शेख हे होते.

धुलीवंदनाच्या शुभदिनी नगर पंचायतच्या भव्य पटांगणावर आयोजित हास्यकलोळ कार्यक्रमात “चला हवा येवू द्या” फेम प्रवीण तिखे तर मराठी पाऊल पडते पुढे फेम हास्य कलावंत एजाज खान यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याप्रमाणेच विनोदवीर हास्य कलाकार प्रा.हेमंत चौधरी, पुरुषोत्तम गावंडे, कवी तथाअँकर साहिल दरने यांनी हस्यरंग उधळले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून इंदिरा सूत गिरणीचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते सुनील कातकडे, गजानन किन्हेकर, जि.प.सदस्या अरुणा खंडाळकर, उपसभापती संजय आवारी, नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की, सरपंच अरविंद ठाकरे तसेच विशेष अतिथी म्हणून ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ओंकार चेके, तहसीलदार दीपक पुंडे, ठाणेदार राजेश पुरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे, वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आयोजित हास्यकल्लोळ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिबा पोटे, तालुका अध्यक्ष माणिक कांबळे, कार्याध्यक्ष देवेंद्र पोल्हे, सचिव नागेश रायपुरे, कोषाध्यक्ष उमर शरीफ, सहसचिव श्रीधर सिडाम, सल्लागार अशोक कोरडे, भाष्कर धानफुलें, सुरेश नाखले, रमेश झिंगरे, बंडू डुकरे, दिलदार शेख यांनी परिश्रम घेतले.
मारेगाव: बातमीदार