Home Breaking News बापरे बाप… पुन्हा वाघ, बैलाचा पाडला फडशा

बापरे बाप… पुन्हा वाघ, बैलाचा पाडला फडशा

1780
C1 20240404 14205351

मेंढोली शिवारातील घटना

रोखठोक | काही महिन्यापूर्वी तालुक्यात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. वन विभागाने एका नरभक्षी वाघाला जेरबंद केले होते. मात्र पुन्हा एकदा तालुक्यात वाघाची दहशत निर्माण झाली असून मेंढोलीत वाघाने बैलाचा फडशा पाडला आहे.

तालुक्यातील निळापुर, ब्राम्हणी, कोलेरा, उकणी, पिंपळगाव या गावात काही महिन्यांपूर्वी वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. वाघाच्या हल्यात दोघांना जीव देखील गमवावा लागला होता तर अनेकांची जनावरे फस्त करण्यात आली होती.

गावकऱ्यांच्या मागणी वरून वन विभागाने जंगलात सर्च ऑपरेशन राबून वाघाला जेरबंद करून नागपूर येथील गोरेवाडा येथे रवानगी केली होती. त्यानंतर तालुक्यात वाघाची दहशत थांबली होती मात्र दोन महिन्यांनी पुन्हा एकदा वाघाची तालुक्यात एन्ट्री झाल्याचे दिसत आहे.

मेंढोली पासून अवघा दोन किलो मीटर अंतरावर वारगाव शिवारातील देवराव धांडे यांची शेतात सोमवारी सकाळी मेंढोली येथील अनरशा काळे यांच्या बैलाची वाघाने शिकार केली. या घटनेत शेतकऱ्याचे 60 हजाराचे नुकसान झाले आहे.
वणी : बातमीदार