Home Breaking News कार व दुचाकीची धडक, दुचाकीस्वार जखमी

कार व दुचाकीची धडक, दुचाकीस्वार जखमी

● यवतमाळ मार्गावरील घटना

1920

यवतमाळ मार्गावरील घटना

Wani News | यवतमाळ मार्गावरील मंगरूळ गावाजवळ कार ने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला तर दहा वर्षीय मुलगी किरकोळ जखमी झाले आहेत.  ही घटना गुरुवार दि. 20 जुलै ला दुपारी 12 वाजताच्या दरम्यान घडली. The car hit the bike hard The bike rider was seriously injured in this accident.

प्रमोद नानाजी पाचभाई (40)असे जखमी दुचाकीस्वारचे नाव आहे ते कुचना येथील निवासी आहेत. तो आपल्या दुचाकी क्रमांक MH- 34- 6371ने कोलगाव कडून मंगरूळ मार्गाने मुलगी राधा हिचेसह वणी कडे जात होते. वेगाव फाट्यावर मारेगाव वरून वणीकडे जात असलेल्या भरधाव चारचाकी वाहन क्रमांक MH- 49- B- 2416 ने दुचाकीला धडक दिली.

या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अपघात होताच नागरिकांनी गर्दी केली. तर प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सूचित केले. जखमी दुचाकीस्वाराला तातडीने मारेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
ROKHTHOK NEWS