Home Breaking News कत्तली साठी नेणाऱ्या 27 जनावरांची सुटका

कत्तली साठी नेणाऱ्या 27 जनावरांची सुटका

230

* वणी पोलिसांची कार्यवाही,

* तीन गोवंश तस्कर ताब्यात 

वणी बातमीदार: कत्तल करण्यासाठी निर्दयपणे बांधून असलेल्या 27 जनावरांची सुटका वणी पोलिसांनी केली असून 2 लाख 72 हजार रुपये किमतीचे जनावरे ताब्यात घेऊन तिघांना अटक करण्यात आली आहे.

लगतच असलेल्या तेलंगणा राज्यात कत्तली साठी जनावरांची तस्करी केली जाते.पोलिसांनी अनेकदा करवाया करून शेकडो जनावरांना जीवनदान दिले आहे.आठवड्याभरा पूर्वीच पोलिसांनी 2 क्विंटल गो मास जप्त केले होते हे विशेष.

शहरातील खरबडा परिसरात निर्दयपणे कत्तलीसाठी जनावरे बांधून असल्याची गुप्त माहिती ठाणेदार वैभव जाधव यांना मिळाली डीबी पथकाने सापळा रचून दि 19 ऑगस्ट च्या मध्यरात्रीला त्या परिसरात धाड टाकली असता 27 जनावर बांधून असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी त्या 27 जनावरांची कसायाच्या तावडीतून सुटका केली व राजु मधुकर झिलपे वय(25) रा. खरबडा मोहल्ला वणी, इलियास मुमताज अली खान(39)रा. गोकुलनगर वणी, शाहरूख खान लैलाब खान(28)रा. खरबड़ा मोहल्ला वणी या तिघांना अटक केली आहे.

सदरची कार्यवाही दिलीप पाटील-भुजबळ पोलीस अधीक्षक यवतमाळ,  खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, संजय पुज्जलवार उपविभागीय पोलीस अधिकारी  वणी यांचे मार्गदर्शनात पो. नि. वैभव जाधव, डी. बी. पथकाचे पोउपनि गोपाल जाधव, सुदर्शन वानोळे, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, अशोक टेकाडे,पंकज उंबरकर, विशाल गेडाम, दिपक वांडूसवार, मिथुन राउत, संजय शेद्रे, यांनी केली गुन्हयाचा पुढील तपास डोमाजी भादीकर करीत आहे.